धुळे तालुक्यातील कापडणे येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 09:24 PM2020-04-16T21:24:35+5:302020-04-16T21:24:54+5:30
विनाकारकरण बाहेर फिरणारे, तसेच तोंडाला मास्क न लावणाऱ्यांचे केले जातेय चित्रीकरण
आॅनलाइन लोकमत
कापडणे (जि.धुळे) :कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संचारबंदी लागू केलेली आहे.तसेच कडक निर्बंध घालून देण्यात आले आहेत. कापडणे गावामध्ये बेजबाबदारपणे वागणारे, कायद्याचे उल्लंघन करणारे तसेच तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणाºयांचे चित्रीकरण करण्यात येत असून, या बेजबाबदार लोकांवर कापडणे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद, सोनगीर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावातील छायाचित्रकार जितेंद्र पाटील यांच्या सहकार्याने व कापडणे ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र कापडणे यांच्या आदेशाने गावातील मुख्य चौकात व्हिडिओ चित्रीकरण केले जात आह. काम नसतांनाही गावात दुचाकीवर फिरणारे तसेच तोंडाला मास्क न लावता घराबाहेर पडणाºयांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी धनराज पाटील, शरद भिका बोरसे, महेश संभाजी पाटील, बँक आॅफ महाराष्ट्र शाखा कापडणेचे कर्मचारी सोनू पाटील आदींमार्फत गावातील नवा दरवाजा चौकात बेजबाबदारपणे वागणाºयांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकाला मास्क बांधणे बंधनकारक केले आहे.
सरपंच जया प्रमोद पाटील, ग्राम विकास अधिकारी किशोर शिंदे, , प्रमोद गुलाबराव पाटील्, सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील आदींचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान गावात चित्रीकरण सुरू झालेले असल्याने, मास्क न लावता बाहेर पडणे, दुचाकींवर गावात फिरत राहणाºयांवर लगाम बसलेला आहे.