चेष्टा-मस्करीवरून हाणामारी
By admin | Published: March 17, 2017 12:16 AM2017-03-17T00:16:22+5:302017-03-17T00:16:22+5:30
चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शदाबनगरात बुधवारी दुपारी चेष्टा-मस्करीवरून वाद होऊन दोन गटात हाणामारी झाली़
धुळे : शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शदाबनगरात बुधवारी दुपारी चेष्टा-मस्करीवरून वाद होऊन दोन गटात हाणामारी झाली़ त्यात परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याबाबत शेख हबीब शेख युसूफ (वय 57, रा़ शदाबनगर, बीएसएनएल ऑफीसजवळ, धुळे) यांनी चाळीसगाव रोड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाची अब्दुल नबी अब्दुल रहेमान मन्यार (रा़ शदाबनगर) याने चेष्टा-मस्करी केली़ त्याबाबत जाब विचारल्याचा राग येऊन त्यांना अब्दुल मन्यार याने हाताबुक्क्यांनी मारहाण केली़, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़
परस्परविरोधात अब्दुल नबी अब्दुल रहेमान मन्यार यांच्या तक्रारीनुसार, शेख निसार याच्या पाठीवर थाप मारल्याचा राग आल्याने शेख हबीब शेख युनूस व शेख निसार शेख हबीब (रा़ शदाबनगर) या दोघांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी दोघांच्या तक्रारीवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
बोरीस येथे हाणामारी
धुळे तालुक्यातील बोरीस येथे बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली़
याबाबत शिवाजी पीतांबर देवरे (वय 40, रा़ बोरीस) यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, समाधान शहाणा गिरासे हा गायीला पाहून आडवे-तिडवे बोलल्याच्या कारणावरून त्याला याबाबत जाब विचारल्याच्या कारणावरून त्याच्यासह भटू लालसिंग गिरासे, मनोज गिरासे (सर्व रा़ बोरीस) यांनी देवरे यांच्यासह इतरांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ या वेळी शिवाजी देवरे यांच्या मुलाचा मोबाइल खाली पडून गहाळ झाला़ याप्रकरणी शिवाजी देवरे यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आह़े
तसेच परस्परविरोधात शहाणाभाऊ लालसिंग गिरासे (वय 65 रा़ बोरीस) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलाला शिवाजी पीतांबर देवरे, संगीता शिवाजी देवरे व पप्पू शिवाजी देवरे (रा़ बोरीस) या तिघांनी मुलीला आडवे-तिडवे का बोलत आहे, असे म्हणून हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत़