पोलीस अधीक्षकांची कारवाई; दोन वर्षांसाठी सात तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:27 PM2017-10-30T22:27:16+5:302017-10-30T22:29:18+5:30

सोमवारी सायंकाळी उशिरा पोलीस प्रशासनाकडून माहिती प्राप्त

Action of the Superintendent of Police; Seven bridges for two years | पोलीस अधीक्षकांची कारवाई; दोन वर्षांसाठी सात तडीपार

पोलीस अधीक्षकांची कारवाई; दोन वर्षांसाठी सात तडीपार

Next
ठळक मुद्देदोन दिवसांत धुळे सोडा़़़जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पारित केलेल्या आदेशानुसार, देवा सोनार, भूषण सोनार, सचिन बडगुजर, विजय जाधव आणि भूषण माळी (चोर) यांच्यासह सर्व सात जणांना आदेश पारित झाल्यापासून दोन दिवसांत धुळे शहर व जिल्हा सोडणे बंधनकारक आहे़ त्या तारखेपासून दोन वर्षांच्या मुदतीकरिता धुळे जिल्ह्याच्या हद्दीत पोलीसांच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या लेखी परवानगीशिवाय प्रवेश करता येणार नसल्याचे आदेशात नमुद आहे़

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  : जिल्हा पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण करणाºया देवा व भूषण सोनारसह सात जणांना तडीपार केले आहे़ दोन दिवसांत त्यांनी जिल्ह्यातून बाहेर जावे असा आदेश पोलीस अधीक्षकांनी पारित केला आहे़
देवेंद्र उर्फ देवा चंद्रकांत सोनार, भूषण चंद्रकांत सोनार, सचिन भास्कर बडगुजर, विजय उर्फ लड्डया बापू जाधव, भूषण उर्फ भुºया राजेंद्र सुर्वे, भूषण राजेंद्र माळी, प्रशांत प्रकाश बडगुजर (सर्व रा़ जुने धुळे) यांच्या विरूध्द आझाद नगरचे पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मुंबई पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्याकडे सादर केला होता़ सदर प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षकांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये अधिकाराचा वापर करून वरील सात जणांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ 

Web Title: Action of the Superintendent of Police; Seven bridges for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.