धुळ्यात अवैधरित्या सिगारेट बाळगल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:11 PM2017-11-30T17:11:58+5:302017-11-30T18:20:53+5:30

एलसीबी : सव्वा दोन लाखांची पाकिटे जप्त

Action by taking illegal cigarettes in Dhule | धुळ्यात अवैधरित्या सिगारेट बाळगल्याने कारवाई

धुळ्यात अवैधरित्या सिगारेट बाळगल्याने कारवाई

Next
ठळक मुद्दे अवैध सिगारेट विक्री करणाºयांवर एलसीबीकडून कारवाई दोघाविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंदअवैध व्यवसाय करणाºयांचे धाबे दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : वैधानिक इशारा असलेली चित्र योग्य आकारात नाहीत आणि विदेशी कंपनीची सिगारेट ठेवली, या कारणावरुन सिगारेट विक्री करणाºयांवर एलसीबीच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली़ दोन ठिकाणी केलेल्या कारवाईतून सव्वा दोन लाखांची पाकिटे जप्त करण्यात आली़ 
मंगळवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आग्रा रोडवरील साखला पान सेंटरमध्ये तसेच तेथून जवळच असलेल्या राजकमल टॉकिजमागे असलेल्या सुनील सुपारी सेंटर येथे तपासणी केली़ शासनाने ठरवून दिलेल्या योग्य आकाराचे आणि वैधानिक चित्र व वैज्ञानिक इशारा नसलेल्या पाकिटांमधील सिगारेट विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले़ त्यामुळे साखला पान सेंटरमधून ८८ हजार ५०० रुपये किंमतीचा सिगारेटचा माल जप्त करण्यात आला़ तर सुनील सुपारी सेंटरमधून १ लाख ७६ हजार रुपये किंमतीची सिगारेटची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत़ 
याप्रकरणी पोलीस कर्मचारी विजय पोपट मदने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राजेश निर्मल साखला (रा़ सेवादास नगर, धुळे) आणि पोलीस कर्मचारी मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरुन संशयित प्रकाश मोहनलाल आसीजा (रा़ कुमार नगर, धुळे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला़ पुढील तपास सुरु आहे़ 

Web Title: Action by taking illegal cigarettes in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.