एसपीडीएम महाविद्यालयात उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 11:17 AM2019-09-04T11:17:43+5:302019-09-04T11:18:15+5:30

शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक मंडळाच्या एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात रासेयो, आय़सी़टी़सी़ विभाग उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच आंतरराष्ट्रीय ...

Activities at SPDM College | एसपीडीएम महाविद्यालयात उपक्रम

एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून एडस्चे बोधचिन्ह साकारले.

googlenewsNext

शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक मंडळाच्या एस़पी़डी़एम़ महाविद्यालयात रासेयो, आय़सी़टी़सी़ विभाग उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून एडस्चे बोधचिन्ह साकारले.
याप्रसंगी  आयसीटीसी विभाग उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी  गोपाल वानखेडकर,  सतिष माळी,  नाना बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर महाविद्यालयातून प्रबोधन फेरी काढण्यात आली. या फेरीला प्राचार्य डॉ़एस़एऩ पटेल यांनी हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी प्राचार्य डॉ़एस़एऩ पटेल, उपप्राचार्य डॉ़महेंद्र पाटील, उपप्राचार्य दिनेश पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ़सुरेंद्र कांबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ़सुभाष आठवले, प्रा़नाजीर पठाण, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा़मंजुला साळवे, डॉफ़ुला बागुल, प्रा.बेडिस्कर तसेच रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Activities at SPDM College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे