स्रेहसंमेलनात आदर्श मातांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:12 PM2019-01-08T22:12:33+5:302019-01-08T22:13:06+5:30
शिरपूर : डॉ़ विजयराव रंधे स्कूलमध्ये गुणगौरव सोहळा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरातील डॉ़विजयराव रंधे स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आदर्श मातांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले़
किसान विद्या प्रसारक संस्थेचे डॉ.विजयराव व्ही़रंधे इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये डॉ़विजयराव रंधे यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच झाले. आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थाध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांनी केले़ यावेळी संस्थेच्या खजिनदार आशा रंधे, विश्वस्त लीर्ला रंधे, भाजपा तालुका प्रभारी डॉ.जितेंद्र ठाकूर, जि़प़सदस्या सीमा रंधे, हर्षाली रंधे, नगरसेवक रोहित रंधे, श्यामकांत पाटील, व्यवस्थापक ए़ए़ पाटील, देविदास पाटील, एमक़े़ भामरे, अॅड.जितेश पोतदार, प्राचार्या कामिनी पाटील, सारिका ततार, मुकेश पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
आनंद मेळाव्यात ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात प्रथम हर्षल बडगुजर, द्वितीय जय रोहित रंधे, तृतीय गंधर्व कुलकर्णी तर उतेजनार्थ निमित्त तिवारी यांनी बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रशांत पाटील, प्रा.रेखा पातुकर, स्मिता कोठारी, डॉ़सोनाली बोडखे यांनी केले.
यानंतर गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी केले. यावेळी आशाताई रंधे, लीलाताई रंधे, मंगला पावरा, प्रसन्न मोहन, रोहित रंधे, प्रा़जी़व्ही़पाटील, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विविध गाण्यांवर बाल गोपालांची पावले थिरकत होती. त्यात एकूण ४४ ग्रुप सहभागी झाले. यानंतर बक्षीस वितरण सोहळा झाला.
यावेळी आदर्श माता पुरस्कार सीमा देविदास पाटील, विजया एम़भामरे यांचा सन्मान चिन्ह, शाल बुके व साडी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माता पालक उषा माळी, प्रतिभा कार्तिक, मंदोदरी बागुल, गौरी दिनेश, वर्षा बोरसे, चंद्रमा ठाकरे, दिपाली माळी, मोनिका जैन, उषा माळी, शितल ठाकरे, मोनिका पाठक, प्रियांका चावडा, ज्योती चावडा, दामिनी बडगुजर यांचा सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. वर्षभरातील शैक्षणिक गुणवत्ता विविध उपक्रमात प्रथम व खेळात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रतीक्षा पावरा व तुषार भामरे यांना देण्यात आला. सुत्रसंचालन सुवर्णा पाटील, मंगला मराठे, विशाल सोनगडे यांनी केले.