गोताणेचा जलयुक्तमध्ये समावेश करा
By admin | Published: January 13, 2017 12:21 AM2017-01-13T00:21:52+5:302017-01-13T00:21:52+5:30
धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे
धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे. पाण्याअभावी शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. यासाठी गोताणे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी गोताणे ग्राममंचायतीतर्फे ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
गोताणे गावात सुमारे सहा हजार लोकसंख्या असून येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. संपूर्ण जीवन शेतीवरच अवलंबून असते. या गावाला मोठय़ाप्रमणात वनक्षेत्र तसेच छोटय़ा मोठय़ा नद्या नाल्यांचे भौगोलिक अनुकूलता लाभलेली आहे. परंतु कायम दुष्काळी भाग असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावलेली आहे. परिणामी आजही हजारो एकर शेती कोरडवाहूच आहे. याकरीया उपाय योजना करणे गरजेचे आहे. अनेक वर्षापासून अतिवृष्टीमुळे गोताणे येथील निमदरा धरण फुटलेल्या अवस्थेत आहे. या धरणावर शेकडो एकर शेती अवलंबून असून धरण फुटल्यामुळे सदर जमीन कोरडवाहू झाली आहे. तसेच बामदरा आणि मंजुळ्या या पाझर तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साठला असून यातील पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. तसेच यास गळतीही मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी या धरणावर अवलंबून असलेल्या बागायतीचे प्रमाण कमी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरीही लवकर तळ गाठत असतात. गोताणे वनक्षेत्र तसेच शेतशिवारातील नाल्यांचेही खोलीकरण करुन याठिकाणी सिमेंटचे साठवण बंधारे होणे गरजेचे आहे.
सदर कामे करण्यासाठी गोताणे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी एका ठरावाद्वारे कृऊबाचे संचालक अजरून पाटील, सरपंच भगवान पाटील, सेवासोसायटीचे चेअरमन जिभाऊ वारु पाटील, ग्रा.पं. सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी चेअरमन धुडकू पाटील, हिरालाल पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सरदार पाटील, उपाध्यक्ष चुडामण पाटील, वसंत पाटील, हिंमत अहिरे, सोसायटीचे संचालक आनंदा पाटील, दगडू पाटील, विनायक पाटी, हिंमत पाटील, दाजभाऊ पाटील यांच्यासह शेतक:यांनी केली आहे.