अतिरिक्त सीईओ माळोदे यांनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:34 PM2019-08-13T23:34:25+5:302019-08-13T23:34:39+5:30
दीडवर्षानंतर नियुक्ती: तडवी यांनी केले स्वागत
धुळे : तब्बल दीड वर्षानंतर जिल्हा परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार येथील ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप माळोदे यांनी मंगळवारी धुळे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन मुंडे यांचे बदली झाल्यानंतर या पदाचा अतिरिक्त पदभार मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडेच होता. धुळे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ६ आॅगस्टला नंदुरबार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संदीप माळोदे यांची नियुक्ती झाली होती. नियुक्तीनंतर त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. माळोदे यांनी यापूर्वी प्रोबेशनरी अधिकारी म्हणून धुळ्यात कामकाज केले आहे. आतापर्यंत त्यांनी नाशिक, जालना, निफाड, औरंगाबाद, निफाड, नंदुरबार या ठिकाणी सेवा बजावली आहे.
मंगळवारी त्यांचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांनी स्वागत केले.
दरम्यान आता जिल्हा परिषदेला अतिरिक्त मुख्य र्कायकारी अधिकारी लाभल्याने, कामाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.