भोंगऱ्या बाजाराच्या तयारीत आदिवासी बांधव व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:43 PM2019-03-08T22:43:44+5:302019-03-08T22:43:59+5:30

होलिकोत्सव : सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Adivasi brothers busy in Bhonagarya market busy | भोंगऱ्या बाजाराच्या तयारीत आदिवासी बांधव व्यस्त

dhule

Next

शिरपूर : आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणारा भोंगऱ्या उत्सव व होलिकोत्सव अवघ्या काही दिवसावर येवून ठेपला आहे़ आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून सातपुड्यांच्या पाड्यांवर ढोलचे निनाद ऐकू येऊ लागले आहेत़
सध्याच्या डिजिटल युगात देखील सातपुड्याच्या कुशीत अजूनही परंपरा, चालीरिती टिकून आहेत़ हा वारसा आदिवासी बांधवांनी टिकून ठेवला आहे़ आपल्या मनातील वाईट विचार तसेच वाईट प्रवृत्तीला दहन करण्याचा संदेश देण्याºया होळीचे आदिवासी बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे़ फाल्गुनी पौर्णिमेपासून सुरू होणाºया होलिकोत्सवात गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरलेले पावरा, गावित, मावची, भिल्ल समाज एकत्र येत असतात़
यंदाही सातपुड्याच्या परिसरात तसेच दºया-खोºयातील, अतिदुर्गम भागात मजुरीसाठी स्थलांतरीत झालेले समाजबांधव उत्सवासाठी गावाकडे परतू लागली आहेत़ त्यामुळे काही अंशी ओस पडलेली गावे आता पुन्हा चैतन्य पसरले आहे.
होलिकोत्सवानिमित्त समाज बांधवांमध्ये प्रथेनुसार फाग मागण्याची पध्दत देखील आहे़ दुर्गम तसेच अतिदुर्गम भागात फाग अर्थात देणगी मागण्याची प्रथा आजही कायम आहे़ महिला व पुरूष गाव-पाड्यांमध्ये फाग मागताना दिसून येत असतात़ होलिकोत्सव साजरा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून पारंपारिक वाद्ये, ढोल, दागिने, पारंपरिक आभूषणे, शस्त्रे आदिंवर शेवटचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे़ १५ दिवस चालणाºया या होलिकोत्सवाची तयारी सुरू असल्याने परिसरात उत्सवाआधीच चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे़

Web Title: Adivasi brothers busy in Bhonagarya market busy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे