धुळे जिल्हयातील शांततेसाठी प्रशासन जनतेसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:02 PM2018-07-18T12:02:57+5:302018-07-18T12:04:43+5:30

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आश्वासन

Administration of peace for the people of Dhule district | धुळे जिल्हयातील शांततेसाठी प्रशासन जनतेसोबत

धुळे जिल्हयातील शांततेसाठी प्रशासन जनतेसोबत

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांनी केली नागरी हक्क संरक्षण समिती सदस्यांशी चर्चा जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध धंदे बंद करण्याची मागणी शांततेसाठी प्रयत्न करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आश्वासन

आॅनलाइन लोकमत

धुळे : शहरवासियांनी जिल्हा प्रशासनाचे कान व डोळे बनावे. शहरासह जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासन जनतेसोबत असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी नागरी हक्क संरक्षण समितीला दिले. शहरातील गुंडगिरीला आवर घाला आणि सर्वसामान्यांना शांततेत जगू द्या अन्यथा नागरिक हक्क संरक्षण समिती आंदोलन छेडेल असा इशारा समितीच्यावतीने महेश घुगे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे दिला होता. त्या पार्श्वभूमिवर रेखावार यांनी समिती सदस्यांना चर्चेसाठी बोलविले होते.

गुंडाच्या आर्थिक स्त्रोतांचा शोध घ्या, अवैध धंदे बंद करा, टोळी युद्धाची माहिती मिळताच प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करा, खंडणी बहाद्दरांना आळा घाला, शहरात होर्डिंग्ज, फलक लावण्यास परवानगी देणाºया मनपा प्रशासनावर कारवाई करा, महामंडळाच्या बसेस निर्धारित जागेवरत थांबण्याची सक्ती करा, डीजे सदृश्य ध्वनी यंत्रणेने होणारे ध्वनी प्रदुषण बंद करा, भविष्यात जातीय दंगली होणार नाहीत, याची दक्षता घ्या आदी विषयांवर पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांशी दोन तास चर्चा केली. धुळे शहराच्या भविष्यासाठी नागरी हक्क संरक्षण समितीने उचलेले पाऊस संयुक्तीक आहे. जिल्हा प्रशासन प्रभावी कार्यवाहीसाठी आग्रही राहील असे आश्वासन दिले. यावेळी महेश घुगे, हिरालाल ओसवाल, के.डी.मिस्तरी, किसनराव खोपडे, रवी बेलपाठक, प्रा.एन.एम. जैन, अ‍ॅड. एस.आर.पाटील, गोपाळ केले, उत्तमराव पाटील, महेंद्र महाराज, परिणात चव्हाण, हरीभाऊ राठोड, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

 

 

 

Web Title: Administration of peace for the people of Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.