गोराण्याच्या शेतकºयाच्या आंदोलनामुळे प्रशासन झुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:14 PM2018-07-03T12:14:04+5:302018-07-03T12:42:46+5:30
टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील शेतकरी शरद पाटील यांनी शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून टॉवरवर चढून मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्या प्रयत्न केला़ घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी आणि शिंदखेडा तहसीलदार यांनी घटनास्थळ गाठले़ त्या शेतकºयाला समजविण्याचा प्रयत्न केला़ लेखी आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्याने या शेतकºयाने १२ वाजून २० मिनीटांनी आंदोलन मागे घेत तो टॉवरवरुन खाली उतरला़
शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील एमआयडीसीबाबत शासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळल्याने या भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत़ या नैराश्यापोटी शरद भटू पाटील हा शेतकरी मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोबाईल टॉवरवर चढला होते़ घटनेची माहिती मिळताच या भागातील शेतकºयांनी घटनास्थळी गर्दी केली होती़ या ठिकाणी तातडीने प्रांताधिकारी गणेश मिसाळ, शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन हे घटनास्थळी पोहचले़ शेतकºयाला समजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला़ शेतकरी शरद पाटील याने उचललेल्या पावलामुळे मात्र प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले होते़ शेतकºयाच्या मागण्या लक्षात घेऊन प्रशासनाच्यावतीने लेखी आश्वासन देण्यात आले़ त्यामुळे अखेर दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी या शेतकºयाने आंदोलन मागे घेतले़