शेतक-यांच्या पात्र यादींची आता प्रशासकीय पातळीवर पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:35 PM2017-10-30T22:35:15+5:302017-10-30T22:35:55+5:30
जिल्हा प्रशासन : मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होणार काम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकºयांची यादी ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर आता जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरले आहेत? याची पडताळणी करण्याचे काम तालुकानिहाय सुरू आहे. हे काम मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे.
राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज सादर केले होते. परंतु, या सर्व अर्जांची पडताळणी शासनाच्या आयटी विभागाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र शेतकºयांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, आॅनलाइन अर्ज करणाºया शेतकºयांपैकी काही शेतकºयांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पात्र शेतकºयांची नावे ही संकेतस्थळावर जाहीर झाली असून त्यानुसार आता जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरले आहेत? याची पडताळणी केली जात आहे. उद्या सायंकाळपर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांची आकडेवारी समजणार आहे.
- जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक