१० वर्षानंतर बुराईला पूर, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:24 AM2017-10-12T11:24:10+5:302017-10-12T11:25:29+5:30
परतीचा पाऊस : म्हसाळे गाव परिसरात घरांची पडझड, लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात मंगळवारी रात्री १९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळे माळमाथ्यावर म्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे. तसेच बाजरी, मका आणि कापूस पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. पांझरा आणि बुराई नदीला पूर आला आहे. शिंदखेडा शहरातील नदीच्या काठावर राहणाºया लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी रात्री जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे माळमाथ्यावरील म्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे.
बळसाणे - साक्री तालुक्यातील म्हसाळे गावातील कृष्णा नथ्थू ईशी यांच्या मातीचे घराचे छत्त कोसळले. त्यात संसारोपयोगी साहित्य आणि अन्य सर्वच वस्तु त्याखाली दाबल्या गेल्या आहेत. कृष्णा ईशी यांच्या मुलीचे ३ नोव्हेंबरला लग्न असल्याने त्यासाठी केलेली सर्व खरेदीच्या वस्तुही त्यात गेल्या आहेत. त्यामुळे ईशी कुटुंबिय रस्त्यावर आले आहे.
याशिवाय गावातील गिरधर माणिक कोळी, विलास भिकनराव पाटील, किशोर गिरधर ठाकर, जितेंद्र देविदास बोरसे, लटकनबाई सोनवणे, अमृत पारधी , शालीग्राम चव्हाण यांच्या घरांचीही पडझड झाली आहे. बळसाणे येथील शिवसेना उपविभाग प्रमुख व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी गावास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मसाले ग्रामस्थ महावीर जैन , वना जाधव , महेंद्र निकुंभे , प्रशांत माळी , योगेश कोळी , परेश जैन , दादा पाटील , चेतन गिरासे , ईश्वर खैरनार यांनी केली आहे.
माळमाथ्यावर बळसाणे, म्हसाळे, छाडवी गावात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. सुमारे दोन ते अडीच तासापर्यंत पाऊस झाला.
शिंदखेडा - परतीच्या पावसाच्या धुळे तालुक्यातील लामकानी, बोरिस, निकुंभे आदी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बुराई नदीची उपनदी पान नदीला पूर आला. पुराचे पाणी बुराई नदीत आल्याने बुराईला मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावर राहणाºया नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.शिंदखेडा येथील बंधारा चिरणे रस्त्याकडील भाग पावसाने मातीचा भराव खचल्याने येथून बंधारा फुटण्याच्या बेतात होता मात्र धुळे येथील पाटबंधारे विभागाचे अभियंता महाजन व चिमठाणे येथील पाट कर्मचारी यांनी लागलीच जेसीबीच्या साहयाने बुजला म्हणून पुढील अनर्थ टळला.
धुळे तालुक्यात लामकानी परिसरात रात्री पाऊस झाल्याने पान नदीला पूर आला. पान नदी ही बेहेड येथे बुराई ला मिळते. त्यामुळे बुराईला मोठा पूर आला आहे. याआधी सन २००६ मध्ये बुराई नदीला पूर आला होता. त्यानंतर १० वर्षानंतर बुराईला असा मोठा पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीकाठी एकच गर्दी केली होती.
गेल्या चार दिवसापासून होत असरलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे बुराई नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शहरातील गाव दरवाज्याजवळ राहत असलेल्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीतून नदीचे पाणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ॅॅ