अखेर मालनगावचे पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:09 PM2018-11-29T22:09:17+5:302018-11-29T22:09:57+5:30

शेतक-यांना  दिलासा : रब्बी पिकांसाठी पाण्याची होती मागणी

After all, the water from Malanganga was left | अखेर मालनगावचे पाणी सोडले

अखेर मालनगावचे पाणी सोडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवेल : मालनगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने पाटचारी तत्काळ दुरूस्त करून शेतकºयांना रब्बी हंगामासाठी पाणी पुरवण्याची मागणी केली होती़ त्याबाबतचे वृत्त लोकमत मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने अखेर पाटचारीतून पाणी सोडले आहे़ 
साक्री तालुक्यातील दहिवेल परिसरात असलेले मालनगाव धरण ४०० दलघफू क्षमतेचे आहे़  १९८९ साली १९२० हेक्टर क्षेत्र २२०० लाभार्थी  शेतकरी व १६ गावांमधील ५० हजार लोकवस्तीसह या भागातील अर्थव्यवस्था या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे़ मालनगाव, खरडबारी, वर्जेपाडा, खांडबारा, झिरणीपाडा, सातरपाडा, बोडकीखडी, दहिवेल, भोनगाव, कालदर, बोदगाव, शिरवाडे, आमोडे, किरवाडे, घोडदे, सुरपान, छडवेल, अष्टाणे, कावठे या गावांमधील खरीप पिके ही २५ किमी लांब पाटचारीतील पाण्यावर अवलंबून आहे़ मालनगाव धरणाची पाटचारी नादुरूस्त झाल्याने पाटचारीत पाणी सोडण्यास अडचण निर्माण झाली होती़ मालनगाव धरण बचाव संघर्ष समिती आमदार डी़एस़ अहिरे यांनी पाटबंधारे प्रशासनाकडे पाठपुरावा करून जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले व दिड महिन्यात पाटचारी दुरूस्त करण्यात आली़ 
‘लोकमत’ने पाटचारी दुरूस्त व्हावी व शेतकºयांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्याच्या मागणीसंदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाटचारीतून पाणी सोडले़ त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़ शेतकºयांनी रब्बी पिकांसाठी पाणी अर्ज भरावे, असे आवाहन करण्यात आले़ 

Web Title: After all, the water from Malanganga was left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे