मनपात सभापती निवडीनंतर जल्लोष!
By admin | Published: January 16, 2017 11:59 PM2017-01-16T23:59:58+5:302017-01-16T23:59:58+5:30
सभापती : स्थायी- कैलास चौधरी, महिला व बालकल्याण - इंदूबाई वाघ, राष्ट्रवादीचे यश
धुळे : महापालिका स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे कैलास चौधरी यांची, तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी इंदूबाई वाघ व उपसभापतीपदी चंद्रकला जाधव यांची निवड झाली़ सभापती निवडीनंतर मनपात फटाक्यांच्या आतषबाजीसह एकच जल्लोष करण्यात आला़ तीनही पदांवर निवड झालेले सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत़ दरम्यान, नूतन सभापती लवकरच पदभार स्वीकारणार आहेत़
हात उंचावून मतदान
मनपा स्थायी व महिला बालकल्याण समिती सभापतीपदाची निवडणूक सोमवारी पार पडली़ या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, आयुक्त संगीता धायगुडे, निवडणूक निर्णय उपजिल्हाधिकारी जयसिंग वळवी व प्ऱनगरसचिव मनोज वाघ उपस्थित होत़े स्थायी सभापती निवड प्रक्रियेला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली़ या पदासाठी विहित मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कैलास चौधरी, तर भाजप-सेना युतीतर्फे वालीबेन मंडोरे यांचे अर्ज प्राप्त झाले होत़े त्यानंतर अर्जाची छाननी प्रक्रिया झाली व त्यात दोन्ही अर्ज वैध असल्याचे जाहीर करण्यात आल़े अर्जावर हरकत घेण्यासाठी वेळ देण्यात आला. मात्र या अर्जावर कुणीही हरकत घेतली नाही़ त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला़ मात्र कुणीही माघार न घेतल्याने 11़30 वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली़ या वेळी स्थायी समितीच्या सदस्यांनी हात उंचावून मतदान केल़े यात कैलास चौधरी यांना 13, तर वालीबेन मंडोरे यांना 3 मते मिळाली़ सर्वाधिक मते मिळाल्याने सभापतीपदी कैलास चौधरी यांची निवड झाल्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी जाहीर केल़े निवडणुकीत कैलास चौधरी यांच्या बाजूने स्वत: त्यांच्यासह कमलेश देवरे, दीपक शेलार, नाना मोरे, गुलाब महाजन, साबीर सैयद, इस्माईल पठाण, चित्रा दुसाने, मायादेवी परदेशी, ललिता आघाव, जैबन्निसा पठाण, यमुनाबाई जाधव, हाजराबी शेख यांनी मतदान केले, तर वालीबेन मंडोरे यांच्या बाजूने स्वत: त्यांच्यासह शिवसेना गटनेते संजय गुजराथी, ज्योत्स्ना पाटील यांनी मतदान केल़े सभापतीपदी कैलास चौधरी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे व आयुक्त संगीता धायगुडे यांनी सभापतींचा सत्कार केला़ त्यानंतर मनपा आवारात समर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी एकच जल्लोष केला़ त्यानंतर सजविलेल्या वाहनातून नूतन सभापतींची मिरवणूक काढण्यात आली़ या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, शहराध्यक्ष मनोज मोरे, माजी महापौर जयश्री अहिरराव, यशवर्धन कदमबांडे, सभागृह नेते कमलेश देवरे, पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होत़े
महिला बालकल्याण सभापती, उपसभापतींची निवड
महिला बालकल्याण समिती सभापती निवडणुकीला दुपारी 1 वाजता सुरुवात झाली़ सभापतीपदासाठी इंदूबाई वाघ व उपसभापतीपदासाठी चंद्रकला जाधव यांचे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले होत़े छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आल़े त्यानंतर माघारीसाठी वेळ देण्यात आला़ अखेर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सभापतीपदी इंदूबाई वाघ व उपसभापतीपदी चंद्रकला जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर करून त्यांचा सत्कार केला़ त्यानंतर ढोल- ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला़