धुळ्य़ात पाठलाग करून युवकाकडून तलवार जप्त
By admin | Published: June 17, 2017 01:20 PM2017-06-17T13:20:53+5:302017-06-17T13:20:53+5:30
परिसरात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचा:यांनी तात्काळ पाठलाग करीत तलवार ताब्यात घेतली.
ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 17 - शहरातील मुख्य टपाल कार्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी युवकामध्ये झालेल्या वादातून एकाने थेट तीक्ष्ण तलवार काढली. तलवार हातात घेऊन तो एकाच्या मागे पळत सुटल्याने नागरिकांची धावपळ उडली. त्याचवेळी परिसरात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचा:यांनी तात्काळ पाठलाग करीत तलवार ताब्यात घेतली.
पोलिसांची ही शिघ्र कृती व घडलेल्या सिनेस्टाईल प्रसंगाचे उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात होती
शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे पोलीस कर्मचारी मिलिंद सोनवणे, संजय जाधव, योगेश चव्हाण व महेश जाधव हे दुचाकीने शुक्रवारी सायंकाळी गस्त करण्यासाठी आग्रा रोडवर निघाले होत़े त्यावेळी मुख्य टपाल कार्यालय ते सराफ बाजार रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात गर्दी व धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. काय झाले हे पाहण्यासाठी त्यांनी दुचाकी थांबवून घटनास्थळी गेल़े त्याचवेळी टपाल कार्यालयासमोर पंक्चर काढणा:या एकाने दुकानातून स्टीलची साडेतीन फुटी तीक्ष्ण तलवार काढून एकाच्या मागे पळत सुटला. तलवार काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होवून तेही पळू लागले. त्यामुळे चौघा पोलीस कर्मचा:यांनी तलवार घेऊन पळणा:यांचा पाठलाग करून त्याला थांबविल़े तेव्हा त्याने हवेत तलवार फिरविली़ राहुलसिंग मोहनसिंग गुरखा असे त्याचे नाव आह़े त्याला पोलिसांची ताब्यात घेतल़े त्यांच्यासह संबंधित पंचर दुकान असलेल्या मालकालाही पोलीस ठाण्यात आणले.