शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार समितीत धुळ्यातून अॅड़ प्रकाश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:49 PM2018-09-07T13:49:18+5:302018-09-07T13:50:47+5:30
पुरस्कार निवडीसाठी समिती : भारत सरकारचा नवा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : केंद्र सरकारच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार समितीमध्ये धुळे जिल्ह्यातून शिंदखेडा तालुक्यातील पढावद येथील अॅड़ प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली़
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत घोषणा केल्याप्रमाणे दुप्पट करण्यासाठी उपाय सुचविण्यासाठी काही समित्या नेमल्या. त्यात एक समिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कुलगुरू विश्वनाथ यांचे अध्यक्षतेखाली नेमली. त्यात शासकीय अधिकारी, कृषी विद्यापीठ अधिकारी, निवृत्त अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी यांची निवड केलेली आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त व जिवनधारा शेतकरी उत्पादक कंपनी अध्यक्ष अॅड प्रकाश पाटील (पढावद) यांची निवड झालेली आहे. या सोबत जळगाव जिल्ह्यातील नरेंद्र पाटील (लोणी ता़ चोपडा), नंदुरबार जिल्ह्यातील हिम्मतराव माळी (न्याहली) यांचीही निवड झालेली आहे.
यासोबतच समितीत राहुरी कृषि विद्यापीठाचे विस्तार संचालक किरण कोकाटे, संशोधन संचालक शरद गडाख, द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक सावंत, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालिका डॉ जोस्ना शर्मा, कांदा लसुण संशोधन केंद्राचे संचालक मेजर सिंग, तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील माजी कुलगुरू राजाराम देशमुख, सुभाष पुरी, वाय़ एस ़नेरकर ( धुळे), टी़ ए़ मोरे समिती सदस्य रहाणार आहेत़ तसेच शासकीय प्रतिनिधी म्हणुन नाशिक विभागीय कृषि सह संचालक रमेश भटाणे, कोल्हापूर विभागीय कृषि सह संचालक व इतर प्रतिनिधी आहेत.