सेल्फी विरोधात माध्यमिकच्याही 11 संघटना एकवटल्या
By admin | Published: January 8, 2017 11:41 PM2017-01-08T23:41:39+5:302017-01-08T23:41:39+5:30
समन्वय समितीची बैठक : व्यसन जनजागृतीसंदर्भात व्याख्यान
धुळे : दर सोमवारी विद्याथ्र्यासोबत सेल्फी घेऊन ती माहिती शासनाला सादर करण्याच्या निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षण विभागाच्या 18 संघटनांबरोबरच माध्यमिक शिक्षण विभागाच्या 11 संघटनाही एकवटल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्तेवर होणारे परिणाम व इतर परिणामांचा विचार करता या निर्णयावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात रविवारी नकाणे रोड येथे आयोजित शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या बैठकीतही सेल्फीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
या वेळी माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघ, शिक्षक परिषद, शिक्षकेतर कर्मचारी संघ, शिक्षक लोकशाही आघाडी, द.आ.पु. शिक्षक संघ, ओबीसी शिक्षक सेल, क्रीडा शिक्षक संघ, कला अध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वि.मा. भामरे, एस.बी. गोसावी, डी.के. पवार, विजय बोरसे, बी.डी. भदोरिया, विलासराव पाटील, डी.बी.साळुंखे, प्रा.डी.पी.पाटील, प्रा.प्रदीप दीक्षित, एस.डी.मोरे, आर.आर.साळुंखे, आर.बी. अमृतकर, देवानंद ठाकूर, पी.जी. साळुंके, महेश मुळे, के.सी. साळुंखे आदी उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक शाळेचा विचार केला असता आदिवासी, दुर्गम भागातील तसेच अपुरे तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीच्यावेळी तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तसेच शाळेतील मुलींच्या पालकांचा याला विरोध आहे. यामुळे दैनंदिन अध्यापन आणि विद्याथ्र्याच्या गुणवत्तावाढीवर फार मोठा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम या निर्णयावरसुद्धा दुष्पपरिणाम होणार आहे.
शिक्षकांच्या कार्यप्रणालीवर शंका
यामुळे वेळेचा अपव्यय आहे. गुणवत्ता विकासाकडे दुर्लक्ष होणार आहे. शिक्षणाच्या मुख्य हेतुलाच हारताळ फासला जाऊ शकतो. शिक्षकांकडे सध्या शिक्षकांकडे अशैक्षणिक कामे जास्त आहेत. ग्रामीण भागात नेटचा प्रॉब्लेम आहे. सोमवारी महत्त्वाचा अध्यापनाचा वेळ वाया जाणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीच्यावेळी येणा:या सर्व जाचक अडचणींचा विचार करता कोणीही सेल्फी काढू नये. या उपक्रमात कोणत्याही शाळेने, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी सहभागी न होण्याचे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.