कृषी दुकान फोडून कापूस बियाणे लंपास
By अतुल जोशी | Published: May 24, 2024 09:55 PM2024-05-24T21:55:42+5:302024-05-24T21:56:01+5:30
साक्रीतील घटना, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल.
धुळे : साक्री शहरातील कृषी केंद्राचे दुकान फोडून चोरट्याने कापूस व मक्याचे बियाणे तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २३ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी साक्री पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
साक्री शहरातील नवापूर रोडवर असलेल्या कृषी केंद्राच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी राशी व अजित सीड्सचे कपाशीचे १ लाख ११ हजार ४५६ रुपयांचे १२९ पाकिटे, तसेच ६ हजार ९६० रुपये किमतीचे मक्याचे चार पाकिटे व रोख रक्कम सात हजार असा एकूण १ लाख २५ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सचिन निंबा काकुस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक संदीप मोरे करीत आहेत.