कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच झाले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:19 PM2019-02-23T12:19:11+5:302019-02-23T12:20:23+5:30
अन्यथा आंदोलन करण्याचा युवा सेनेचा इशारा
आॅनलाइन लोकमत
धुळे- कृषी विद्यापीठ हे जिल्ह्यातच व्हावे तेही पूर्णत: अन्यथा युवक, विद्यार्थी धुळेकर नागरिकांसह आंदोलन करतील असा इशारा युवा सेनेने अपर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
कृषी विद्यापीठ धुळ्यात व्हावे यासाठी धुळे जिल्हा युवासेने तर्फे वेगवेगळी आंदोलने छेडण्यात आली.मात्र गुरूवारी भुसावळ येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेमुळे धुळेकरांच्या स्वप्नांवर घाला घालण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शिवसेना-युवासेना हे होऊ देणार नाही. यासाठी मोठा लढा उभारण्याच्या तयारीत आम्ही राहू. यासाठी आंदोलन छेडू. मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून धुळे जिल्ह्यावर अन्याय करू नका याबाबत विनंती करण्याचा प्रयत्न करू. याबाबत धुळे जिल्हा युवासेनेची महत्वाची बैठक २४ रोजी सकाळी ११ वाजता धुळे जिल्हा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, झाशी राणी पुतळ्या जवळ, प्रबोधनकार ठाकरे संकुलात आयोजित केली आहे. कृषी विद्यापीठ पूर्णत: धुळे जिल्ह्यात व्हावे यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सर्व युवासेनेच्या पदाधिकारींनी व युवासैनिकांनी, विद्यार्थी युवकांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आव्हान युवासेना महाराष्ट्र सहसचिव तथा जिल्हाप्रमुख अॅड.पंकज गोरे यांनी केले आहे.