धर्मा पाटील यांच्या शेताचे पंचनामे कृषी अधिका-यांनी कार्यालयात बसूनच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:07 PM2018-01-29T15:07:41+5:302018-01-29T15:09:02+5:30

शासनाला घरचा आहेर : अनिल गोटे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची केली मागणी

Agriculture officials of Panchchanama farming area of ​​Dharma Patil did sit in the office | धर्मा पाटील यांच्या शेताचे पंचनामे कृषी अधिका-यांनी कार्यालयात बसूनच केले

धर्मा पाटील यांच्या शेताचे पंचनामे कृषी अधिका-यांनी कार्यालयात बसूनच केले

Next
ठळक मुद्देभूसंपादनात १३५ कोटीचा गैरव्यवहार धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकल्पासाठी संपादीत केल्या जाणाºया जमिनीच्या व्यवहारामध्ये कोटयावधीचा भ्रष्टाचार आहे. हे मी गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे. मुख्यमंत्र्यांनी खंबीर भूमिका घेऊन धुळ्यातील सर्व्हे नं.५०१ व ५१० या त्यात १३५ कोटीचे शासनाचे बोगस भूसंपादनाचे प्रकरण उघडकीस आले. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून राजकीय नेत्यांच्या संरक्षणाखाली भूमाफीया व दलाल अक्षरश: हैदास घालीत आहेत. त्याचाच दृष्य परिणाम विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येत झाला.दोंडाईचा येथील औष्णिक प्रकल्पासाठी १९९ हेक्टर म्हणजे जवळपास ५०० एकर जमिनीचे भूसंपादन २००९ पासून सुरु होते.

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्या सुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरुन सिद्ध होते की, कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, असा खळबळजनक धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. आमदार गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आमदार गोटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, धर्मा पाटील यांच्या शेतात असलेल्या झाडांचा पंचनामा ९ सप्टेंबर २०१२ रोजी करण्यात आला. त्यात सर्व्हे न.२९१/२अ, क्षेत्र १ हे.४ आर, ३७६ आंब्याची रोपे व पाईप लाईन अशी नोंद   आहे. सर्व्हे नं.२९१/२ ब धर्मा पाटील यांच्या नावावर एक हेक्टर जमिनीत २७१ आंबा रोपे व पक्की विहीर अशी स्वच्छ नोंद आहे. आपल्याकडे असलेल्या कागदपत्रामध्ये तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष शेतावर न जाताच पंचनामा केल्याचे सिद्ध होते. कारण धर्मा पाटील यांचा गट नं.२९१/२अ असा दर्शविला आहे तर नरेंद्र धर्मा पाटील यांचा गट नं.२९८/२ब असा दर्शविला आहे. पंचनाम्यावर कुठलीही तारीख, पंच आणि जमिन मालकाची सही नाही. याउलट ज्या शेतकºयास १ कोटी ९० लाख रुपये मोबदला मिळाला. त्याच्या पंचनाम्यावर मात्र पाच पंचाच्या व जमीन मालकाच्या सह्या आहेत. याबाबत धर्मा पाटील यांनी १४ आॅगस्ट २०१२ रोजी हरकत घेतल्याचे दिसून येते. जमिनीचा मोबदला देण्यात आल्यावर अन्याय होत असल्याबद्दल धर्मा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे २ डिसेंबर २०१७ रोजी, महसूल आयुक्तांकडे ४ डिसेंबर २०१७, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री यांच्याकडे २२ नोव्हेंबर २०१७, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०१७ रोजी केली आहे. तर मतदार संघाचे खासदार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  यांच्याकडे ४ डिसेंबर २०१७ आणि भूसंपादन अधिकाºयाकडे २२ नोव्हेंबर २०१७ रोजी लेखी तक्रार केल्याचे त्यांच्या उपलब्ध कागदपत्रानुसार दिसून येते.
वस्तुत: अधिकाºयांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन वेळीच कारवाई केली असती तर अशी दुर्देवी घटना निश्चितच टळू शकली असती.
धर्मा पाटील यांनी भूसंपादन अधिकारी यांना २ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या लेखी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की,   माझे क्षेत्र जमीन विखरण औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतर्गत येत असल्याने त्यात तशी भू - संपादन ४-१ ची नोटीस मला १६ जुलै २०१२ रोजी प्राप्त झाली. नोटीशीवर मी कायदेशीररित्या कोर्टामार्फत हरकत घेतली. त्यात माझ्या गटातील फळझाडे आंब्याच्या झाडाविषयी पूर्वसुचना दिली तरी माझ्या हरकतीवर भू - संपादन अधिकारी वर्ग -१ धुळे यांनी लेखी उत्तर पाठविले. त्यात शासकीय निवाडयात ठरले त्याप्रमाणे मोबदला देण्यात येईल, असे म्हटले. स्थळनिरीक्षण पंचनामे पिकपेरे असे सर्व असतांना मला फळझाडांचा मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले आणि माझ्या बाजूच्या गटात गट नं.२९०/३, २२७/१, २२७/२ हे तिन्ही गट बाहेरगावच्या एजंटने घेतल्याने त्यात फळझाडे मोबदला देण्यात आला. परंतू सर्वसामान्य शेतकºयाला मुद्दाम डावलण्यात आले. तरी मला असा भेदभावाची वागणूक शासनाने देवू नये. वरील तिन्ही गटात   एजंट जयदेव दत्तात्रय देसले या नामक व्यक्तीने शासनाचे कोटयावधी रुपये मिळविले. पण प्रकल्पातील माझ्यासारख्या सामान्य शेतकºयाला डावलण्यात आले आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तरी माझ्यावर झालेल्या अन्यायाची त्वरित दखल घेऊन मला योग्य न्याय लवकरात लवकर एक महिन्याच्या आत द्यावा अन्यथा मला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही. याची संबंधित अधिकारी व शासनाने दखल घ्यावी. अन्यथा माझ्या मृत्यूस या प्रकारणातील सर्व शासकीय यंत्रणा जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे म्हटले होते.
धर्मा पाटील यांच्या वरील निवेदनावरुन स्पष्ट दिसते की, त्यांच्या इशाºयाला कोणीही गांभीर्याने घेतले नाही.
आतातरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राष्टÑीय महामार्ग क्र.६ तसेच अन्य प्रकल्पासाठी सुरु असलेल्या भूसंपादनाच्या कामाची सखोल चौकशी करुन भूमाफीया व दलालानी घातलेल्या गोंधळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासंबंधी आवश्यक ती कठोर कारवाई युद्धपातळीवर करावी. भविष्यात कुठल्याही शेतकºयाचा धर्मा पाटील होऊ नये याची काळजी घेतली जावी, असे निवेदनात शेवटी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे.

Web Title: Agriculture officials of Panchchanama farming area of ​​Dharma Patil did sit in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.