अहिराणी बोलणारा कधीही अडाणी नसतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 10:20 PM2020-12-26T22:20:03+5:302020-12-26T22:20:03+5:30

आहिराणी संमलेनाध्यक्ष बापूसाहेब हटकर

Ahirani speaker is never ignorant | अहिराणी बोलणारा कधीही अडाणी नसतो 

अहिराणी बोलणारा कधीही अडाणी नसतो 

Next

चंद्रकांत सोनार 
जगाच्या पाठीवर दोन काेटी लाेक आहिराणी भाषिक आहे. त्यातील बहूसंख्य लोकांचे वास्तव मुळ खेळ्यातील आहे. आजही आपली भाषा, आपली संस्कृती टिकावी, यासाठी आठड्यातील पाच दिवस इंग्रजी भाषा बोलतात आणि सुटीचे दाेन दिवस परिवारासोबत राहून दिवसभर आहिराणी भाषेतून संवाद साधतात. मुलांना कधीही सांगत नाही की तुम्ही इंग्रजी बोला, मात्र आपली माय अहिराणी जिवंत राहीली पाहिजी यासाठी सातसमुद्रापलीकडे असतांना प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही आहिराणी भाषा बोलणारा कधी अडाणी नसतो, आणि नव्या पिढीने समजूही नये, असा आवाहन विश्व अहिराणी परिषदेचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर यांनी ‘लोकमत’शी बाेलतांना सांगितले. 
प्रश्न : पहिल्या विश्व आहिराणी साहित्य संम्मेलनाचा आयोजनाचे हेतू काय
उत्तर : २६ ते २८ डिसेंबर हे तीन दिवस पहिले विश्व आहिराणी साहित्य संम्मेलन आयोजन केले आहे. जगातील २७ देश व ५ खंडातील २ कोटीपेक्षा अधिक आहिराणी भाषिक लोकांचे अन्य देशामध्ये वास्तव्याला आहे. अहिराणी भाषा लिहतांना अडचण येते. मात्र बोलतांना मात्र अडचण येत नसतांना ही अनेकांना आहिराणी बोलतांना लाज वाटते. त्यामुळे आहिराणी अन्य भाषेच्या तुलनेत मागे पडत चालली आहे. या भाषेला दर्जा मिळावा, सन्मान मिळावा हा या संम्मेलनाचा हेतू आहे.
प्रश्न : अनेकांना अहिराणी भाषा येते, मात्र बोलणे टाळतात, याविषयी काय सांगाल?
उत्तर : खान्देशातील व आहिराणी भाषिक लोकांचे वास्तव्य २७ देशांमध्ये वैज्ञानिक, डाॅक्टर, अभियंता, विधीतज्ञ आहेत. त्यातील  शिंदखेडा तालुक्यातील पोपटराव पाटील हे १९५८ पासून अमेरिकेत वास्तव्याला आहे. आजही कानुमाता, गाेधंळ तसेच नातवांची जाऊड काढण्यासाठी परिवारासह आपल्या गावी येतात. आपल्या गावाविषयी प्रेम, खाद्य पदार्थ तसेच भाषेचा आदर राहावा, यासाठी मुल, सुना व नातवंडानासोबत सुटीच्या दिवशी आहिराणीत संवाद साधतात. आपल्याकडे ग्रामीण भागातून काॅलनीत जरी आलो तरी आहिराणी बोलणे टाळतात आणि मराठी बोलायला लागतो याचे खरच दुर्दव वाटते.
प्रश्न :  आहिराणी साहित्य संम्मेलनातून नेमका कोणता ठराव होणार आहे ?
उत्तर : एकीकाळी खेडात वास्तव्याला असलेले लोक आज परदेशात उच्च पदावर आहेत. कोट्यावधींचे मालक आहेत. मात्र त्यांना तेथे राहून देखील आहिराणी भाषेला कधी कमी समजले नाही. लोकांमध्ये गैरसमज आहे की, आहिराणी बोललो तर लोक काय समजतील, अडाणी तर नाही समजणार ना ? किंवा खेड्यातून आलोल हे तर नाही समजेल? म्हणुन फोनवर देखील आईशी हळू बोलतांना मी पाहिले आहे. भाषेविषय गैरसमज दुर व्हावा, अन्य भाषांप्रमाणे आहिराणी भाषेला सन्मान मिळावा, यासाठी पहिली ते बी.ए. पर्यतच्या अभ्यासक्रमात आहिराणी भाषेचा समावेश करावा, यासाठी शेवटच्या दिवशी ठराव केला जाणार आहे. 
लग्नपत्रिका तरी अहिराणीत छापा
प्रत्येकाला आहिराणी भाषेचा विसर पडत चालला आहे. त्यामुळे ही भाषा टिकण्यासाठी प्रत्येक आहिराणी भाषिकांने प्रत्येक करणे गरज आहे. आहिराणी जरी लिहण्यासाठी कठीण असली तरी आपल्या धार्मिक कार्यात किंवा लग्न समारंभातील आमंत्रण पत्रिका तरी आहिराणी भाषेत छापाची अशी अपेक्षा आहे. 
दुर राहूनही साधला उत्तम संवाद 
परदेशात वास्तव्याला असलेल्या आहिराणी भाषिकांनी साहित्य समंलेनात सहभागी होण्याचे आवाहनासाठी आहिराणी भाषेत आवाहन केले होते. अनेक वर्षापासून दुर असतांना उत्तर संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. भाषेचा आदर, स्वाभिमान तसेच घरातील व गावातील लाेकांची आहिराणी भाषेत संवाद साधत असल्याने त्यांना दुर राहून देखील त्यांना बोलतांना भाषेची अडचण निर्माण होऊ शकली नाही. 
ऑनलाईन आयोजन
पहिल्यांदाच अहिराणी भाषेला हा जागतिक स्तरावर ऐकली आणि बोलली जाण्याचा सन्मान मिळतो आहे. रोज दुपारी चार वाजेपासून ६.३० पर्यंत आणि सायंकाळी ७ वाजेपासून रात्री ९.३० वाजेपर्यंत हे संमेलन चालेल. या विश्व आहिराणी संम्मेलनाचे स्वागताध्यक्ष विकास पाटील आहे.

Web Title: Ahirani speaker is never ignorant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.