सर्व महत्वाचे निर्णय चर्चा करूनच घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 01:48 PM2019-12-06T13:48:40+5:302019-12-06T13:48:59+5:30
कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांची धुळ्यात माहिती
आॅनलाइन लोकमत
धुळे :कॉँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या मातब्बरांना पुन्हा पक्षात प्रवेश द्यायचा का? मंत्री मंडळात कोणाला संधी द्यायची यासह सर्व महत्वाचे निर्णय चर्चा करूनच घेतले जातील. दरम्यान मंत्रीमंडळात तरूणांना संधी दिली जाईल असे सूचक वक्तव्य महाविकास आघाडीचे कॅबीनेट मंत्री तथा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.
एका खासगी लग्नसमारंभात निमित्ताने बाळासाहेब थोरात आज धुळ्यात आले असता, त्यांची गोंदूर विमानतळावर भेट घेतली असता ते बोलत होते.
जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी कॉँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाईल का? असे विचारले असता त्यांनी फक्त सर्व निर्णय चर्चा करून घेतले जातील. तसेच मंत्रीमंडळात तरूणांना संधी दिली जाईल असे सूचक वक्तव्य करून अधिक बोलण्यास नकार दिला.
काँग्रेस आघाडीच्या काळात धुळे जिल्ह्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे. गेल्या पंधरा वीस वषार्पासून काँग्रेस आघाडीकडून जिल्ह्याला अध्याप मंत्री मंडळात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आमदार कुणाल पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यंनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे गोंदुर विमानतळावर जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, प्रमोद जैन, लहू पाटील, विजय देवरे, पंढरीनाथ पाटील, राजीव पाटील, छोटू चौधरी, भटू चौधरी, अविनाश महाजन, भानुदास माळी, एन. डी. पाटील, प्रमोद सिसोदे, बापू खैरनार, प्रमोद भदाणे, राजेंद्र भदाणे, भोलेनाथ पाटील , रामकृष्ण नेरकर, सरपंच पांडुरंग मोरे, हर्षल साळुंखे, धर्मदास बागुल, यांच्यासह साक्री शिंदखेडा शिरपूर धुळे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.