शिरपूर तालुक्यातील पिंप्री येथील सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:50 AM2019-02-14T11:50:11+5:302019-02-14T11:51:32+5:30

ग्रामपंचायत निवडणूक : २४ रोजी मतदान, २५ रोजी मतमोजणी

All the members, including the Sarpanch of Pimpri in Shirpur taluka, are unopposed | शिरपूर तालुक्यातील पिंप्री येथील सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध

शिरपूर तालुक्यातील पिंप्री येथील सरपंचासह सर्व सदस्य बिनविरोध

Next
ठळक मुद्देशिरपूर तालुक्यात १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकायापैकी पिंप्री ग्रामपंचायत बिनविरोधआता २४ रोजी होणार मतदान

आॅनलाइन लोकमत
धुळे : शिरपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीसाठी निवडणूका जाहीर झाल्या होत्या़ माघारीअंती पिंप्री येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यामुळे उर्वरीत ९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २८ तर सदस्यपदासाठी १२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ तसेच पिळोदा ग्रामपंचायतीत संपूर्ण ९ सदस्य बिनविरोध झालेत मात्र सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे.
अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी सरपंच पदासाठी २३ तर सदस्य पदासाठी ८३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. माघारीनंतर पिंप्री ग्रामपंचायतीची सरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. पिळोदा ग्रामपंचायतीत संपूर्ण ९ सदस्य बिनविरोध झालेत मात्र सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. १० ग्रामपंचायतीत एकूण ३१ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. रुदावली ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीच्या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. आता रिंगणात असलेल्या सरपंच व सदस्य पदांची निवडणूक २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.तर मतमोजणी २५ रोजी होणार आहे.
पिंप्री ग्रामपंचायतीत प्रविणसिंग रामकृष्ण राजपूत हे सरपंचपदी बिनविरोध निवडून आलेत़ तर सदस्यपदी काशिनाथ दला भिल, कमलबाई संजय कोळी, संजय सरदार धनगर, इंदुबाई उमेशसिंह राजपूत, आरती प्रवीण भिल, वंदनाबाई रणजीत गिरासे, महेंद्र एकनाथ गिरासे हे बिनविरोध निवडून आले.





 

Web Title: All the members, including the Sarpanch of Pimpri in Shirpur taluka, are unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.