आचारसंहितेबाबत सर्वपक्षांनी दक्षता घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:12 PM2018-11-28T22:12:17+5:302018-11-28T22:13:05+5:30
आयुक्तांकडे बैठक : मतदान प्रक्रिया, यंत्र, मतदार स्लीपबाबत दिली माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची सर्व पक्ष व उमेदवारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन राजकीय पक्ष, प्रतिनिधींच्या बैठकीत आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले़
मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांना व पक्षांना निवडणूक प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नये व निवडणूक आयोगाच्या नियमांची व निर्देशांची माहिती व्हावी यासाठी बुधवारी आयुक्त दालनात राजकीय पक्ष व प्रतिनिधींची बैठक झाली़ या बैठकीप्रसंगी आचारसंहितेचा दृष्टीने सर्व मुद्यांवर व उमेदवार, पक्षांना येणाºया अडचणींच्या मुद्यांबाबत चर्चा झाली़ संपर्क कार्यालयांची परवानगी, झेंडे, बॅनर याबाबत आयोगाचे निर्देश, उमेदवाराने पक्षाने देणगी, गिफ्ट, मदत हे सर्व निवडणूक खर्चाच्या हिशोबात समावेशीत करावे़ ट्रु व्होटर्स अॅपची कार्यपध्दती, पक्ष व उमेदवाराने निवडणूक प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची दक्षता याबाबत बैठकीत चर्चा झाली़ सदर बैठकीत महानगरपालिकेने क्रमांक व इतर सर्व माहिती देण्यात आली असून उपस्थितांना मतदान स्लिपचा नमुना दाखविण्यात आला. तसेच मतदान यंत्राविषयी तसेच बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट विषयी व त्यामध्ये प्रभाग व उमेदवार निहाय करण्यात येणाºया फिडींगविषयी माहिती देण्यात आली. त्यासाठी वापरण्यात येणारे रंग, मतदानयंत्र नादुरूस्त झाल्यास त्यासाठी असणारी पर्यायी व्यवस्था याबाबत चर्चा झाली़ आचारसंहितेच्या नियमांचे पालन करावे व नियमांचे उल्लंघन करु नका व चुका होऊ देऊ नका. अन्यथा त्याचे परिणाम होणार असून सर्वांनी काटेकोर दक्षता घ्यावी. तसेच जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. बैठकीस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते़