अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गावीत यांच्याकडून गैरवापर, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:32 AM2018-08-08T05:32:04+5:302018-08-08T05:32:38+5:30
खासदार डॉ़ हीना गावीत यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे़
धुळे : खासदार डॉ़ हीना गावीत यांनी अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर खोटा गुन्हा दाखल केला आहे़ त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक मनोज मोरे यांच्यासह गुन्हा दाखल असलेले सर्व कार्यकर्ते बुधवारी सकाळी स्वत:हून शहर पोलिसात हजर होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली़
मराठा क्रांती मोर्चाच्या काही आंदोलकांकडून गावित यांच्या वाहनाची तोडफोड केली होती़ त्यानंतर याप्रकरणी दिलगिरीदेखील व्यक्त केली़ परंतु तरीही गावीत यांनी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला, नंतर संसदेत हा प्रश्न उपस्थित करून कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला, असे मराठा क्रांती मोर्चातर्फे मनोज मोरे, प्रा़ शरद पाटील, निंबा मराठे यांनी सांगितले.