कुवे येथील ९ जणांना कर्णबधीर यंत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:19 PM2018-12-16T17:19:00+5:302018-12-16T17:19:32+5:30
शिरपूर : पटेल परिवाराच्या प्रयत्नाने
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील कुवे येथील ९ रूग्णांना पटेल परिवाराच्या प्रयत्नांनी कर्णबधिर यंत्र मशीन वाटप करण्यात आले.
आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील कुवे येथील ९ रुग्णांना कर्णबधीर यंत्र मशीन देण्यात आले़ शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तपनभाई पटेल यांच्या हस्ते आमदार कार्यालयात कर्णयत्रांचे वाटप करण्यात आले. त्यात हिरकणबाई बारकु पाटील, मनिषाबाई नंद्लाल पाटील, इंदूबाई मगन पाटील, मधुकर दौलत गुजर, बुधा वना भिल, शालू सुभाष गुजर, अन्वर पिंजारी, मनोज यशवंत मराठे, सुरेया पिंजारी या गरजुंना देण्यात आले़ प्रत्येकी एका मशीनची किंमत ८ हजार ९०० रूपये इतकी आहे़ ऐकू यायला अडचण वाढल्याने तसेच बहिरेपणामुळे त्रास होऊ लागल्याचे लक्षात आल्याने या सर्व गरजूंची समस्या उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व नगरसेवक तपनभाई पटेल यांनी तातडीने सोडविली. त्यामुळे सर्व गरजु रूग्णांनी पटेल परिवाराचे आभार मानले.
यावेळी डॉ.पवन पाटील, युवक तालुकाध्यक्ष योगेश बोरसे, जिल्हा महासचिव भुपेंद्र गुजर, जिल्हा महासचिव रितेश राजपूत, खुशाल पाटील, निलेश पाटील, संदीप शिरसाठ, नईम इमानदार, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, विकास योजना आपल्या दारी अभियानचे कार्यकर्ते उपस्थित होते.