महिला बचत गटांना निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:14 PM2019-12-28T23:14:50+5:302019-12-28T23:15:17+5:30

संडे अँकर । ९६ गटांना ८ लाख ६० हजारांचा निधी ; सातशे बचत गट स्थापन

Allocation of funds to women's savings groups | महिला बचत गटांना निधीचे वाटप

Dhule

Next


धुळे : राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत दारिद्रय रेषेखालील ९६ महिला बचत गटांना प्रतिगट १० हजार रुपये याप्रमाणे ९ लाख ६० हजार रुपयांच्या फिरत्या निधीचे वाटप खासदार डॉ़ सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले़
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महिला बचत गटांसाठी कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजिज शेख, भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अपंळकर, स्थायी समितीचे सभापती युवराज पाटील, विरोधी पक्षनेते साबीर शेख, महिला व बालकल्याण समिती सभापती निधी पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक अधिकारी हेमंत भदाणे, नगरसेवक संजय पाटील आदी उपस्थित होते.
७०० बचत गटांची स्थापना
महिलांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात त्यात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ६ वस्तीस्तर संघ स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रती वस्तीस्तर संघाला ५० हजार रुपये फिरता निधी देण्यात येत आहे. एका वस्तीस्तर संघात १० बचतगटांचा समावेश करण्यात आलेला असतो़ ७०० महिला बचत गटांची स्थापन करण्यात आली आहे़

Web Title: Allocation of funds to women's savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे