१०१ महिलांना साड्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 01:27 PM2019-10-31T13:27:43+5:302019-10-31T13:28:14+5:30
निगर्समित्र समितीचा उपक्रम : धुणीभांडी करणाºयांना दिला लाभ
धुळे : निसर्गमित्र समितीतर्फे वलवाडी परिसरातील धुणी-भाडी करणाºया १०१ विधवा, परितक्तया तसेच गरिब कष्टकरी महिलांना साडी व फराळ वाटप करण्यात आले. निसर्गमित्र समितीचे प्रदेश संघटक तथा उद्योजक किशोर डियालाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका विमल पाटील, गोपीचंद नाना पाटील, संजय भामरे, मनिषा डियालाणी, डॉ. पुजा डियालाणी, समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष तथा भोकरचे सरपंच मंगलदास पाटील, प्रभाकर शिरसाठ, एम.वाय.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
वलवाडी परिसरातील गरीब कष्टकरी विधवा, परितक्तया महिलांना दिवाळी निमित्ताने १० वषार्पासून दरवर्षी साडी व फरसाण वाटप करण्यात येते. दिवाळीच्या आनंदी पर्वात तळागाळातील गरीब व गरजू लोकांच्या चेहºयावर आनंद फुलविण्याच्या समाजिक जाणिवेतून आयोजित केलेल्या या अनोखा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांना जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी व अक्षय पाटील यांना धुळे तालुका संघटक पदाचे नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष डी. बी.पाटील यांच्या हस्ते दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वासराव पगार, नरेश चौधरी, भिकाजी देवरे, प्रा. दीपक देशमुख, आर.आर. सोनवणे, प्राचार्य पी.के. पाटील, प्राचार्य आर.ए. पाटील, प्रभाकर रायते, गोपीचंद पाटील, मंदाकिनी शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.