कष्टकरी व विधवा महिलांना साडी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 09:59 PM2019-12-20T21:59:41+5:302019-12-20T22:00:18+5:30
वरूळ : एच़आऱपटेल कन्या शाळेत कार्यक्रम
शिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील एच़आऱपटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातपरिसरातील कष्टकरी, शेतमजुरी करणाऱ्या गोरबरीब व विधवा अशा ११ महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला़ हेमंतबेन पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला.
वरूळ येथील पटेल कन्या शाळेच्या प्रांगणात संस्थेच्या आश्रयदात्या हेमंतबेन पटेल उर्फ मम्मीजी यांच्या ८७ वा वाढदिवसानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम झाले. अध्यक्षस्थानी विखरण बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक पी़ झेड़ रणदिवे होते.
सुरुवातीला परिसरातील कष्टकरी, शेतमजुरी करणाºया गोरबरीब व विधवा अशा ११ महिलांना शिक्षण विस्तार अधिकारी रणदिवे, प्राचार्य पी़आऱसाळुंखे, जुने अंतुर्ली जि़प़शाळेचे शिक्षक हिराजी घोडसे, शिसाका संचालक एम़आऱ पाटकर यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले. रणदिवे यांनी शाळा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक केले़ प्रास्ताविक प्राचार्य पी़आऱ साळुंखे, सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी आऱ आऱरघुवंशी यांनी तर आभार प्रदर्शन मंगला पाटकर यांनी मानले. यासाठी डी़ए़ जाधव, एस़जे़ पाटील, एसक़े़ पाटील, बी़जी़ पिंजारी, ए़बी़ महाजन, एऩएस़ ढिवरे, डी़एऩ माळी, बी़एस़ बडगुजर, पी़टी़ पवार, बापू पारधी, पारस जैन, राजेश सोनवणे, बापू भिल यांनी सहकार्य केले.