वाहतूक कोंडीच्या त्रासासोबतच अवैध पार्किंगचाही ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:28 PM2019-12-11T23:28:30+5:302019-12-11T23:28:58+5:30
दत्तमंदिर परिसर : देवपूर परिसरात वाहतूक नियोजनाची आवश्यकता, अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाढला अपघाताचा धोका
धुळे : शहरातील दत्त मंदिराचा परिसर गेल्या काही दिवसांपासून गजबजलेला आहे़ वाहनांची वाढणारी संख्या आणि त्यात पुन्हा अवैध पार्किंग होत असल्यास अपघाताचा धोका संभवतो़ याकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देत असतानाच नागरीकांची देखील जनजागृती करायला हवी़
देवपुरातील दत्तमंदिराचा परिसर दिवसेंदिवस गजबजतोय़ याच चौकात आता मोठ्या प्रमाणावर अवैध पार्किंग होऊ लागली आहे़ अस्ताव्यस्त वाहने लावली जातात आणि याकडे कोणाचेही लक्ष नाही़ परिणामी अपघाताचा धोका असूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांचे फोफावत आहे़ या चौकात हंगामी व्यावसायिकांची संख्या सुध्दा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजत आहे़ मुळात या चौकात होणाऱ्या अवैध पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची बाब अधोरेखित होत आहे़ महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोहीम राबविण्याची आवश्यकता येऊन ठेपली आहे़ अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी़