आमदार अमरिशभाई पटेल, जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:33 PM2018-01-17T12:33:32+5:302018-01-17T12:35:34+5:30
नाशिक, मुंबईची पथके : धुळे, शिरपुरात एकाचवेळी कार्यवाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : उद्योगात भागीदारी असलेल्या धुळे येथील राष्टÑवादीचे नेते व जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे व शिरपूर येथील कॉँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या निवासस्थानी बुधवारी एकाचवेळी सकाळपासून आयकर विभागाच्या पथकांनी चौकशी सुरू केली आहे.
धुळे शहरातील राष्टÑवादीचे माजी आमदार व जिल्हा बॅँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे तसेच कॉँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांच्या शिरपूर येथील निवासस्थानी एकाचवेळेस मुंबई व नाशिक येथील आयकर विभागाच्या पथकांनी चौकशी सुरू केली आहे. या शिवाय शिरपूर शहरातील अन्य उद्योजक व कॉँग्रेस पदाधिकाºयांकडेही आयकर विभागाची चौकशी सुरू असल्याचे कळते.
एका उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारी प्रकरणी आयकर विभागाकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. चौकशी करणाºया या दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी सात ते आठ सदस्यांचा समावेश आहे.
या संदर्भात धुळ्यातील आयकर विभागाशी संपर्क साधला असता अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.