अमराळेत ग्रामस्थाचा आत्मदहनाचा प्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:37 AM2017-02-14T00:37:30+5:302017-02-14T00:37:30+5:30
गावठाण जागेचा विषय : पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद नाही
शिंदखेडा : तालुक्याती अमराळे येथील घनश्याम नानाभाऊ बोरसे यांनी सोमवारी दुपारी येथील पंचायत समिती आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रय} केला. गावठाण जागा ठराव करून ग्रामस्थांच्या नावे नावे दाखल केल्याचा चौकशी अहवालासाठी टाळाटाळ केली जात असल्याने त्यांनी केलेला हा प्रय} कर्मचा:यांनी हाणून पाडला.
अमराळे येथील गावठाण गट नं.1/1 व खळवाड गट नं.1/2 यावर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी 2015 मध्ये अनधिकृत ठराव करून सदर जागा गावातील 119 ग्रामस्थांच्या नावावर करून नमुना नं.8 ला नोंद केली. मात्र सदर जागा नावावर करण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही. ती देण्याचा अधिकार ग्रा.पं.लाही नाही. तरी त्यांनी पदाचा दुरुपयोग करून जागा नावावर करून दिल्याची तक्रार घनश्याम बोरसे यांनी वेळोवेळी येथील पं.स.कडे केली होती. मात्र त्यांनी चौकशीस विलंब केल्याने तक्रारदाराने आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानुसार विस्तार अधिका:याने प्रत्यक्ष गावात जाऊन चौकशी करून अहवाल जि.प. धुळे यांना सादर केला. मात्र तक्रारदार बोरसे यांना त्याची प्रत देण्यास टाळाटाळ होत असल्याचा बोरसे यांचा आरोप होता. त्यावर त्यांनी आत्महदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी ते आले. चौकशी करणारे विस्तार अधिकारी धुळे येथे कार्यशाळेसाठी गेले आहेत, असे सांगून बीडीओ शिवदे यांनी अहवाल उद्या देतो. यावर बोरसे यांनी लगेच बाहेर जाऊन ते रॉकेलचा व आगपेटी घेऊन आले. अंगावर रॉकेल ओतून ते काडीपेटी पेटविणार तोच पं.स. कर्मचारी आखाडे, वानखेडे यांनी तत्काळ त्यांना मज्जाव करून बीडीओंच्या दालनात बसविले.
सहायक गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांनी विस्तार अधिकारी प्रकाश महाले यांना बोलवून घेतले व बोरसे यांना सदर चौकशी अहवालाची प्रत देण्यात आली. त्यामुळे त्यांचे समाधान झाल्याचे सांगून त्यांनी यापुढे आत्मदहन करणार नाही, असा जबाब पोलिसांना लिहून दिला. सोमवारचा दिवस असल्याने कार्यालयात गर्दी झाली होती.
शेकोटीमुळे भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू नंदुरबार : आश्रमशाळेत शेकोटी शेक घेत असतांना जळालेल्या मोहिनी अल्केश गावीत (वय 9) या विद्यार्थिनीचा घरी उपचार घेतांना मृत्यू झाला.
भरडू, ता.नवापूर येथील आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकणारी मोहिनी गावीत ही विद्यार्थीनी 18 जानेवारी रोजी आश्रमशाळा आवारात शेकोटीवर असताना तिच्या कपडय़ांनी अचानक पेट घेतल्याने ती गंभीर भाजली होती.