आंबे शिवारात 36 लाखांचा बेवारस दारूसाठा सापडला
By Admin | Published: July 6, 2017 12:46 PM2017-07-06T12:46:53+5:302017-07-06T12:46:53+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
ऑनलाईन लोकमत
शिरपूर,दि.6 - तालुक्यातील आंबे शिवारातील डोंगराळ भागात दारूचे 40 प्लॅस्टिकचे ड्रम राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुधवारी शोधून काढले. त्यात 36 लाख 40 हजार रुपये किमतीची ही विदेशी दारू आढळून आली.
अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरपूर तालुक्यातील आंबे शिवारातील खड्डापाडा येथील डोंगराळ भागात छापा टाकला़ त्यात 200 लीटर क्षमतेचे 40 ड्रम आढळून आल़े यामध्ये 36 लाख 40 हजार रुपयांची विदेशी दारू हस्तगत करण्यात आली़ या पथकात एम़ एऩ कावळे, डी़ एम़ चकोर, व्ही़ बी़ पवार, डी़ एस़ पोरजे, अनिल बिडकर, एल़ एम़ धनगर, एस़ टी़ भामरे, अनिल निकुंभे, किरण वराडे, अमोद भडागे, प्रशांत बोरसे, अमोल धनगर, भालंचद्र वाघ, कपिल ठाकूर, विजय नहीदे, नीलेश मोरे यांचा समावेश होता़ तपास शिरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी़ एम़ चकोर हे करीत आहेत़