गस्ती पथकाने पकडली आंबा शिवारात दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 05:24 PM2019-04-21T17:24:12+5:302019-04-21T17:24:34+5:30

साडेपाच लाखांचा मुद्देमाल : वाहनांसह दोघांना अटक

Ammunition in the Amba Shivar caught by the speeding squad | गस्ती पथकाने पकडली आंबा शिवारात दारु

गस्ती पथकाने पकडली आंबा शिवारात दारु

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गस्तीवर असताना वाहनाची तपासणी करत दारु पकडली आहे़ वाहनासह ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे़ ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील आंबा शिवारात घडली़ 
शिरपूर तालुक्यातील आंबा ते वरला रस्ता या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून गस्त घातली जात होती़ यावेळी पथकाने काही वाहनांची तपासणी देखील केली़ शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या पथकाला एमपी ०४ जीए २८३६ क्रमांकाची बोलेरो वाहन संशयास्पद रित्या येत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे वाहन थांबविण्यात आले़ चालकाची चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाली़ त्यामुळे संशय अधिकच बळावला़ वाहनाची कसून तपासणी केली असता त्यात मध्यप्रदेश निर्मित व विक्री करता असलेले एकूण बिअर दारुचे ८८ बॉक्स आढळून आले़ या बॉक्समध्ये १ हजार ५६ बाटल्या होत्या़ त्याची १ लाख ५ हजार ६०० रुपये इतकी किंमत आहे़ ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनाची ४ लाख ७५ हजार इतकी किंमत आहे़ असा एकूण ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी संतोष सायदास राठोड (२८, रा़ दुगाणी ता़ वरला जि़ बडवानी, मध्यप्रदेश) आणि संजय शांतीलाल जमरे (२५, अस्फताल फलीया, ग्राम सावरीया, ता़ पाटी, जि़ बडवानी, मध्यप्रदेश) या दोघा संशयितांची प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे़ 
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनील चव्हाण, नाशिक विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, पोलीस    अधीक्षक विश्वास पांढरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ़ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे़ दोघांना अटक करण्यात आली आहे़

Web Title: Ammunition in the Amba Shivar caught by the speeding squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे