अमृत पाटील याला स्पर्धेत कास्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 09:50 PM2019-01-01T21:50:56+5:302019-01-01T21:51:46+5:30

जयहिंदचा विद्यार्थी : ५६ किलो वजन गटात सहभाग

Amrit Patil won the bronze medal in the tournament | अमृत पाटील याला स्पर्धेत कास्यपदक

dhule

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयातील अमृत अरुण पाटील याने जिल्हा क्रीडा संकुल नेहुली, अलिबाग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कीक बॉक्सिंग स्पर्धेत पुणे, नागपूर, कोल्हापूर, मुंबई विभागाच्या खेळाडूंना पराभूत करून ५६ किलो वजन गटात कास्यपदक प्राप्त केले.
अमृत पाटील याचा विकास समितीचे चेअरमन प्रा. सुधीर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ याप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उपप्राचार्या प्रा. अनिता पाटील, प्रा. अजय देशमुख, प्रा. वर्षा पाटील प्रा. प्रभाकर चौधरी, प्रा. नितिन वाळके आदी उपस्थित होते. या यशाबद्द्ल जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण साळुंके, व्हाईस चेअरमन प्रमोद पाटील, प्रदीप भदाणे, चंद्रशेखर पाटील, डॉ. निलीमा पाटील, डॉ. ए. ए. पाटील, उपप्राचार्य डॉ. सी. एन. पगारे, उपप्राचार्या डॉ. विद्या पाटील यांनी कौतुक केले. त्याला क्रीडा संचालक प्रा. प्रभाकर चौधरी, प्रा. नितिन वाळके यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Amrit Patil won the bronze medal in the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे