धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:11 PM2023-08-29T16:11:25+5:302023-08-29T16:24:31+5:30

इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची भासणारी टंचाई या बाबी डोळ्यासमोर ठेवून विविध कंपन्यांनी वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनविण्यावर भर दिला.

An 'electric bike' made by a rickshaw puller's son in Dhule district; Appreciation is pouring in from across the state | धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक

धुळ्यातील रिक्षाचालकाच्या मुलाने बनवली 'इलेक्ट्रिक बाईक'; राज्यभरातून होतंय कौतुक

googlenewsNext

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या गोराणे या एका छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य रिक्षाचालकाच्या मुलाने आपली कल्पकता वापरून विविध प्रकारचे आकर्षक फिचर्स असणारी 'इलेक्ट्रीक बाईक' तयार केली आहे. भूषण नंदू कदम असे या तरुणाचे नाव असून मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने फिजिक्स विषयातून आपली मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. परदेशात नोकरीची संधी उपलब्ध असतानाही त्याने भारतातच राहून देशासाठी काहीतरी 'इनोव्हेशन' करायचे ठरवले.

इंधनाचे वाढते दर आणि दुसरीकडे इंधनाची भासणारी टंचाई या बाबी डोळ्यासमोर ठेवून विविध कंपन्यांनी वीजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बाइक बनविण्यावर भर दिला. जनतेचाही या बाईकला प्रतिसाद मिळू लागला. परिणामी आज मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बाईक दिसू लागल्या आहेत. 'इलेक्ट्रिक बाईकचा प्रयोग देशात यशस्वी झाला असला तरी 'इलेक्ट्रिक बाईकमध्ये निर्माण होणाऱ्या समस्येमुळे या बाईकचे मार्केट अद्यापही मर्यादीत स्वरूपातच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत यात काही बदल करून सर्वसामान्यांना अधिक फायदेशिर ठरणारी 'इलेक्ट्रिक बाइक' बनविता येईल का? या विचारातन भूषण ने त्याच्या कॉलेजच्या अखेरच्या वर्षांतील 'प्रोजेक्ट रिसर्च' साठी 'इलेक्ट्रिक व्हेईकल' हा विषय निवडला होता.

इलेक्ट्रिक व्हेईकलवर रिसर्च करत असताना त्याच्या असे लक्षात आले की, इलेक्ट्रिक साठी वापरण्यात येणाऱ्या बॅटरी हिटींग मोठ्या प्रमाणावर तयार होत असते. ही हिटींग कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची विशेष व्यवस्था नसल्यामुळे बॅटरीचे तापमान वाढून गाड्या पेट घेत असतात. तसेच इलेक्ट्रिक गाडीतील सर्व कॉम्पोनंटपैकी सर्वात महाग असणाऱ्या बॅटरीची क्षमता आणि आयुष्यदेखील कमी होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी भुषणने स्वतःची 'हिट मॅनेजमेंट सिस्टम' तयार केली. यामुळे बाईकच्या बॅटरीचे तापमान नियंत्रणात राहून ती चालकासाठी आणखी सुरक्षित बनली. सध्या उपलब्ध असणाऱ्या 'इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचे आयुष्य २ ते ३ वर्ष मानले जाते. भुषणने तयार केलेल्या 'हिट मैनेजमेंट सिस्टम' मुळे बॅटरीचे आयुष्य ८ ते १० वर्षापर्यंत जाऊ शकते, असा दावा त्याने केला आहे.

'इलेक्ट्रिक बाइक चार्जिंग सध्या ६ ते ७ तासांचा वेळ लागतो. परंतु भुषणने तयार केलेल्या सिस्टममुळे बॅटरी गरम होत नसल्याने फास्ट चार्जिंग करणे शक्य होते. त्यामुळे बॅटरी चार्ज करायला फक्त ३० ते ३५ मिनिटे लागतात. एकदा पुर्ण क्षमतेने चान झलेली बॅटरी १६० ते १८० कि.मी. पर्यंत चालू शकते, असा दावा भुषणने केला आहे. तसेच व्हॉईस कमांड, फिंगर प्रिंट लॉक, गुगल नेवेगेशन ऑल टाइम लोकेशन ट्रैकिंग सिस्टीम यासारखे आणखी इतर काही स्मार्ट फीचर्सचा भुषणने आपल्या 'इलेक्ट्रिक बाइक' मध्ये दिले आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून भूषणची सध्या वाटचाल सुरू आहे. भुषणचे वडील नंदू साहेबराव कदम (पाटील) हे भूमिहीन आहेत. त्यामुळे रिक्षा चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवितात. तर भूषणची आई वंदना पाटील या शेतमजुरी करून कुटुंबाला हातभार लावतात. अशा हलाखीच्या परिस्थितीत भुषणने जिद्दीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले. त्याचप्रमाणे 'इलेक्ट्रीक बाईक'चे नवीन संशोधन केले आहे.

Web Title: An 'electric bike' made by a rickshaw puller's son in Dhule district; Appreciation is pouring in from across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.