अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्तींचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:49 PM2020-04-29T22:49:52+5:302020-04-29T22:50:10+5:30
शिरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सेविका करतायेत घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम, कामगिरीचे होतेय कौतुक
शिरपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा कार्यकर्ती व अंगणवाडी सेविका, आरोग्य विभाग जोखीम पत्करून शहरासह तालुक्यात सर्व्हेक्षणाचे काम करीत आहेत़ अशा महिलांचा शिरपूर पोलिस ठाणे व मी शिरपूरकर माणूसकी जपणारा गु्रपतर्फे सत्कारासोबत सॅनिटायझर किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला़
येथील पोलिस ठाण्याच्या आवारात डीवायएसपी अनिल माने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रांताधिकारी डॉ़विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका सीईओ अमोल बागुल, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़प्रसन्न कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय किरण बाºहे, सागर आहेर, संदीप मुरकुटे आदी उपस्थित होते़
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवित आहे़ याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे़ बाहेर गावाहून काही लोक येत आहेत, त्यांच्या चौकशी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविकांतर्फे केली जात आहे़ कोरोनाच्या संकट काळात प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी शहरात अनेकांचे स्वागत करून औंक्षण केले जात आहे़ तसेच शहरात कोरोना संदर्भात सुरू असलेला सर्वे अंगणवाडी सेविका, सेवक, आशा कार्यकर्ती करीत असून त्यांचे देखील शहरात ठिकठिकाणी औंक्षण करून स्वागत करण्यात येत आहेक़ौतुकास्पद कार्य करणाºया महिलांचा सत्काराचा कार्यक्रम शिरपूर पोलिस ठाणे व मी शिरपूरकर माणूसकी जपणारा गु्रपतर्फे करण्यात आला. त्यांना सॅनिटायझर किट केले.याप्रसंगी आशा कार्यकर्तींनी सर्व्हेक्षणाचे काम करतांना आलेल्या अ अनुभवाचे कथन केलेक़ार्यक्रम यशस्वीतेसाठी मी शिरपूरकर ग्रुपने सहकार्य केले़