अंजनविहिरेत घरावर दगडफेक

By admin | Published: March 20, 2017 11:18 PM2017-03-20T23:18:30+5:302017-03-20T23:18:30+5:30

दोंडाईचा पोलिसात गुन्हा

Anganwichi house picketing | अंजनविहिरेत घरावर दगडफेक

अंजनविहिरेत घरावर दगडफेक

Next

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे येथे एका घरावर दगडफेक करत कुटुंबाला धमकी देण्यात आली़ तसेच दुस:या घटनेत एकास मारहाण करण्यात आली़ याप्रकरणी वेगवेगळ्या तक्रारींवरून दोंडाईचा पोलिसात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
याबाबत श्यामकांत हिंमतराव पाटील (वय 45, रा़ अंजनविहिरे) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 19 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुधाकर दामू पदमोर, मन्साराम परशराम पदमोर, मच्छिंद्र महादू पदमोर, प्रकाश महादू पदमोर, चेतन चतुर पदमोर, सागर रामदास पदमोर (सर्व रा़ अंजनविहिरे) यांनी घरावर दगडफेक केली़, तसेच आपल्यासह परिवाराला शिवीगाळ केली़ शेतीसह गुरांचे नुकसान करण्याची धमकीही दिल्याचे नमूद केले आहे.
याप्रकरणी वरील सहा जणांविरुद्ध दोंडाईचा पोलिसात भादंवि कलम 336, 143, 147, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
तसेच दुस:या घटनेत निरंजन सुधाकर पाटील (वय 20, रा़  अंजनविहिरे) याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 मार्च रोजी सकाळी घरासमोर झोपलेलो असताना योगेश श्यामकांत पाटील, हितेश दिलीप पाटील व भावेश नथ्थू पाटील या तिघांनी झोपेच्या स्थितीत पकडून गावदरवाजाजवळ नेल़े तेथे काशिनाथ भावडू पाटील, पंढरीनाथ चिंधू पाटील, रतिलाल बाबूराव पाटील व शरद काशिनाथ पाटील (सर्व रा़अंजनविहिरे) हे हजर होत़े त्यांनी पकडून ठेवले तर तिघांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद केले आहे.
याप्रकरणी वरील सात जणांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 143, 147, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पो़ह़ेकॉ. शेख करीत आहेत़

Web Title: Anganwichi house picketing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.