धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने े तयार केले ‘पशुसंजीवनी अ‍ॅप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 11:23 AM2018-07-27T11:23:41+5:302018-07-27T11:26:18+5:30

पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती पशुपालकांना मिळणार

Animal Husbandry Department organized by Dhule District Council of Animal Husbandry | धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने े तयार केले ‘पशुसंजीवनी अ‍ॅप’

धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने े तयार केले ‘पशुसंजीवनी अ‍ॅप’

Next
ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाने तयार केले अ‍ॅप विविध योजनांची माहिती मिळणारमहाराष्टÑातील पहिलाच प्रयोग

आॅनलाइन लोकमत
धुळे :   पशुपालकांना  पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची, कार्यशाळा, लसीकरण याची माहिती मिळावी यासाठी  पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंजीवनी अ‍ॅप’ तयार केले आहे. असे  मोबाईल अ‍ॅप तयार करण्याचा हा महाराष्टÑातील पहिलाच प्रयोग असल्याचे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पंकज रापतवार यांनी सांगितले.
या अ‍ॅपच्या माध्यमातून  जिल्ह्यातील पशुपालकांची माहितीचा संग्रहीत करण्यात येणार आहे. त्यानुसार पशुपालकांच्या समस्या, तक्रारी, अडचणी यावर तज्ञांकडून सल्ला पशुपालकांना देण्यात येणार आहे.
या अ‍ॅपमध्ये पशुपालकांना आपले नाव नोंदणी करुन आपली संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. त्या माहितीच्या आधारावर त्यांची नोंदणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात असणार आहे. ही नोंदणी केल्यानंतर पशुपालकांना पशुसंवर्धन विभागामार्फत मिळणाºया  योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यात पशुंना लसीकरणाचे वेळापत्रक, स्थानिक ठिकाणावरील पशुदवाखाना, दवाखान्यातील डॉक्टरांचा क्रमांक, सल्ला याची माहिती असेल.  याशिवाय या अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर प्रत्येक गावनिहाय पशुपालकांचे नांव, मोबाईल नंबर, पत्ता, पशुंची संख्या उपलब्ध होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पशुपालकांची आकडेवारी सहजरित्या मिळू शकणार आहे. याशिवाय पशुपालकांना पशुसंदर्भात तक्रारी असल्यास ते जिल्हा परिषदेच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती किंवा तक्रारी नोंदवू शकतात. यासाठी तक्रारी व पुर्तता असा विभाग अ‍ॅपमध्ये  समाविष्ट करण्यात आला आहे.
या अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालकांची यशोगाथा, दुग्धव्यवसाय संदर्भात माहिती, त्यांचे मार्गदर्शन अशी माहिती इतर पशुपालकांना मिळणार आहे. त्याचबरोबर दुर्गम भागातील एखाद्या जनावराला काही आजार झाल्यास, तज्ज्ञ मंडळी या अ‍ॅपच्या माध्यमातून त्या पशुपालकाला योग्य तो सल्ला देऊ शकतील. 
लवकरच लॉन्च होणार
या अ‍ॅपसाठी मान्यता मिळाली असून त्याला जिल्हा परिषदेने निधीची तरतूद केलेली आहे. लवकरच हे अ‍ॅप पशुपालकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
महाराष्टÑातील पहिलाच प्रयोग
पशुसंवर्धन विभागाने अशा प्रकारे अ‍ॅप तयार करण्याचा हा महाराष्टÑातील पहिलाच प्रयोग असल्याचे सांगण्यात आले. 

 

Web Title: Animal Husbandry Department organized by Dhule District Council of Animal Husbandry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.