अण्णाभाऊ साठे दहावे साहित्य संमेलनाचे डफ वाजवून उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:33 PM2019-07-13T12:33:14+5:302019-07-13T12:34:00+5:30
दोन दिवस वैचारिक प्रबोधन, मंथनाचे
धुळे - शहरातील राजर्षी छत्रपती शाहूमहाराज नाट्यमंदिरात आयोजित कॉम्रेड अण्णाभाऊ साठे दहावे साहित्य संमेलनाचे शनिवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते डफ वाजवून थाटात उदघाटन झाले. या प्र्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात, राज्याचे निवृत्त प्रधान सचिव महेश झगडे, डॉ.मिलिंद आव्हाड, प्रा.गोपाळ गुरू, कॉ.डॉ.भालचंद्र कानगे, डॉ.राहुल वाघ, डॉ.जालिंदर अडसुळ आदी उपस्थित होते.
१३ व १४ जुलै असे दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध सत्र पार पडणार असून व्याख्यान, चर्चा, परिसंवाद अशा विविध माध्यमातून वैचारिक प्रबोधन, मंथन होणार आहे. संमेलनास नागरिकांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.