धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे नियोजन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:20 PM2019-05-05T12:20:18+5:302019-05-05T12:21:28+5:30

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये मिळणार ७६ सुट्या

Announcement of the suspension of primary schools in Dhule district | धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे नियोजन जाहीर

धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या सुट्यांचे नियोजन जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देसुट्यांच्या नियोजनासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकशिक्षक संघटनांचे प्रतिनिधी हजरवर्षभरातील सुट्यांचे झाले नियोजन

आॅनलाइन लोकमत
धुळे : सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दिल्या जाणाऱ्या सुट्यांचे नियोजन शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार या शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण ७६ दिवस सुट्या मिळणार आहे. तर यावर्षी प्रथम सत्र १७ जून १९ पासून सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आलेले आहे.
शाळांचे कामकाज वर्षभरात किमान २२१ दिवस झाले पाहिजे. सुट्यांचे नियोजन करण्या संदर्भात शिक्षण संचालकांचे आदेश होते. त्यानुसार हे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच चारही तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, सोबतच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला जवळपास ३७ जणांची उपस्थिती होती. बैठकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
यात पहिले सत्र १७ जून २०१९ पासून सुरू होणार असून ते १९ आॅक्टोबर १९ पर्यंत राहील. यात दिवाळीची सुटी २१ आॅक्टोबर ते ९ नोव्हेबर १९ अशी १५ दिवसांची राहणार आहे.
द्वितीय सत्राला ११ नोव्हेबरपासून सुरूवात होईल. ते ३० एप्रिल २०२० पर्यंत राहील. त्यानंतर १ मे २० रोजी उन्हाळी सुटी सुरू होईल. २०२० मध्ये उन्हाळी सुटी ३४ दिवसांची असेल. या शैक्षणिक वर्षात सार्वजनिक व प्रासंगिक सुट्यांची संख्या २५एवढी असून, मुख्याध्यापकाधिक , स्थानिक सुट्या दोन असतील. अशा एकूण ७६ दिवस शाळांना सुटी राहणार आहे. पुढील वर्षी १५ जून २०२० मध्ये शाळा सुरू होणार आहे.
दरम्यान शिक्षण संचालकांचे पत्र आल्यानंतरच प्राथमिक विभागाचे सुट्यांचे नियोजन जाहीर करण्यात येत असते. खान्देशात धुळे जिल्हा परिषदेनेच सर्वात अगोदर सुट्यांचे नियोजन जाहीर केले, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली आहे.

 

Web Title: Announcement of the suspension of primary schools in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.