धुळे शहराच्या लॉकडाऊनमध्ये वाढ ; ३ मे पर्यत संपूर्ण लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:27 PM2020-04-27T17:27:13+5:302020-04-27T17:37:16+5:30
जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेश
धुळे : महानगरपालिका हद्दीत २६ एप्रिल पर्यंत कोरोना विषाणूचे १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी शहरात २८ एप्रिलच्या रात्री १ वाजेपासून ते ३ मे पर्यतच्या रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.