चांद्रयान-२ चा देखावा लक्षवेधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:14 PM2019-09-10T22:14:56+5:302019-09-10T22:15:29+5:30
राणा प्रताप मंडळ : देखावा पाहण्यासाठी होते आहे प्रचंड गर्दी
धुळे : यावर्षी गणेशोत्सवात अनेक मित्र मंडळांनी प्रबोधनात्मक देखावे सादर केले. तर गल्ली नंबर ६ मधील राणाप्रताप मंडळाने चांद्रयान-२ चा देखावा सादर केला आहे. हा देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चांद्रयान-२ हे यान चंद्राच्या दक्षिण धु्रवावर पाठविले. भारताची चंद्रावर ऐतिहासिक झेप होती. नासानेही या मोहीमेचे कौतुक केले. दरम्यान गणेशोत्सवात वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांतर्फे प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे गल्ली नंबर सहा मधील राणाप्रताप गणेश मंडळाने यावर्षी चांद्रयान-२ चा देखावा सादर केला आहे. चंद्रावर अब्जावधी संसाधने आहेत. त्याचे उत्खनन करणाºया काही मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊन भारताने यशस्वी उड्डाण केले आहे. यासंदर्भात माहिती दिली आहे. हा देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मंडळाचे हे ५५ वर्ष आहे. मंडळाची बैठक अनिल मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मंडळाची जाहीर केलेली कार्यकारिणी अशी- अध्यक्ष प्रणव बहाळकर, उपाध्यक्ष मंदार लोखंडे, खजिनदार प्रकाश पांडे, सचिव राहूल तारगे यांचा समावेश आहे.