धुळे जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 05:17 PM2018-02-26T17:17:55+5:302018-02-26T17:17:55+5:30
प्रतीक्षा : जिल्ह्यातील राष्टÑीयकृत बॅँकेच्या ७ हजार १९१ शेतकºयांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत समितीमार्फत सुरू आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकºयांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत; तर ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे शेतकरी आहेत.
राज्य शासनाने शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना या वरील योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते.
५५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी ५५ हजार ५०३ शेतकºयांनी अर्ज करूनही त्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत केवळ ३२ हजार २०२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११७ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत केलेल्या समितीतर्फे सुरू आहे. या समितीने आतापर्यंत अनेक अर्ज रद्द ठरविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, समितीने नेमके किती अर्ज रद्द ठरविले? याची अधिकृत माहिती प्रशासनाकडे अद्याप प्राप्त झालेली नाही.