धुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 11:23 AM2020-09-08T11:23:34+5:302020-09-08T11:24:01+5:30

जिल्हा समन्वय समितीचे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

Apply pay scale to eligible teachers in Dhule district | धुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करा

धुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करा

Next

आॅनलाइन लोकमत
धुळे :वरिष्ठ व निवड श्रेणींचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून पात्र शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी यासह विविध प्रलंबित प्रश्नांबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. जिल्ह्यात उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्र्रप्रमुख आदींचे जवळपास १९६ पदे रिक्त आहेत. याच पार्श्वभूमिवर समन्वय समितीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देवुन पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्या, प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती देवुन मराठी व उर्दू माध्यमाच्या मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यात यावीत, पदवीधर प्राथमिक शिक्षकांमधुन अभावित केंद्र प्रमुखांची रिक्त पदे भरावीत, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांमधुन पदोन्नतीने शिक्षण विस्तार अधिकारींची रिक्त पदे भरावीत.ज्या प्राथमिक शिक्षकांची १२ वर्ष व २४ वर्ष सेवा झालेली आहे त्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणींचे प्रस्ताव मागवावेत, प्राथ.शिक्षकांचे प्रलंबित वैद्यकीय बिले विनाविलंब मंजुर करावेत, शासन निणार्याप्रमाणे प्राथ.शिक्षकांच्या विनंती बदल्या कराव्या आदी मागण्यांचा यात समावेश आहे. प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवून प्राथमिक शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
 

Web Title: Apply pay scale to eligible teachers in Dhule district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.