आरोग्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सुंदोपसुंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:43 AM2019-03-10T11:43:53+5:302019-03-10T11:44:32+5:30

महापालिका : प्रशासनावर भ्रष्टाचाराचा ठपका, डॉ़पवारांना विरोध तर डॉ़ मोरेंच्या नियुक्तीची मागणी

From the appointment of Health Officer Sundopusundi | आरोग्याधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सुंदोपसुंदी

dhule

Next

धुळे : महापालिका आरोग्य विभागातील डॉ़ मोरे यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी महिला दिनानिमित्त उपमहापौरांसह महिला पदाधिकाऱ्यांनी रेटा लावला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून डॉ़ पवारांच्या नियुक्तीची चर्चा तर पदाधिकाऱ्यांकडून मात्र डॉ़ मोरेंच्या नियुक्तीचा आग्रह धरला जात आहे़
भरती प्रक्रियेतून डावलेले
आरोग्य विभागाव्दारे राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उपमहापौर कल्याणी अंपळकर यांना सहभागी करून घेतलेले नाही़ त्यामुळे नाराज झालेल्या महापौर अंपळकर यांनी भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे़
डॉ़ पवारांच्या नियुक्तीला विरोध
मनपा आरोग्य डॉ़बी़बी़ माळी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहे़ त्यामुळे नव्याने भरती होणाºया भरती प्रक्रिेयेसाठी निवृत्त आरोग्य अधिकारी डॉ़ पवार यांनी वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज केला आहे़ शैक्षणिक पात्रतेसह धुळे-नंदूरबार जिल्हात आरोग्य अधिकारी म्हणुन कामाचा अनुभव तसेच नाशिक येथे प्राचार्य तर मुंबई आरोग्य विभागातही प्रदिर्घ कामाचा अनुभव, वयोमर्यादा, सामाजिक आरक्षणाच्या अटी, निकष पुर्ण असल्याने डॉ़ पवार यांचे आरोग्य अधिकारी पदासाठी चर्चेत आहे़ मात्र मनपा अधिकाºयांनी निवृत्त अधिकाºयांकडून आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा प्रशासनावर आरोप केला जात आहे़ त्यामुळे ही भरती प्रक्रिया तत्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़
डॉ़ मोरेंची नियुक्तीची मागणी
महापालिका आरोग्य विभागात सन १९९८ पासून आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे़ योग्य शैक्षणिक पात्रता, धुळ्यात येण्यासाठी अधिकाºयांची पाठ, आस्थापनाचा वाढीव खर्चाची अडचण या अडचणीमुळे आरोग्य अधिकाºयांचे पदे रिक्त होते़ त्यामुळे रिक्त पदाचा भार १२ वर्षापासून डॉ़ माळी यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे़ या पदासाठी डॉ़ पवारांचे नाव चर्चेत आहे़ मात्र या पदासाठी मनपा आरोग्य विभागातील डॉ़ चंद्रकला मोरे यांच्यासह महिला डॉक्टरांना प्राधान्य द्यावे अशी मागणी उपमहापौरांसह समर्थकांनी केली होती़ नियुक्ती करा अन्यथा संघर्षाचा पावित्रा देखील घेण्यात आला आहे़ त्यामुळे डॉ़ पवार यांना विरोध तसेच डॉ़ चंदक्रला मोरे यांच्या निवडीसाठी महिला पदाधिकाºयांकडून का आग्रह धरला जात आहे़, यामागील कारणांसंदर्भात महापालिकेच्या वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे़
मुलाखतीनंतर झाला संघर्ष सुरू
आरोग्य विभागातील रिक्त पदाच्या भरतीसाठी शुक्रवारी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आली यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त शांताराम गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ़माळी, लेखापाल, सिव्हील सर्जन यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यांनतर दुपारी महापालिकेत भरती प्रकियेत भ्रष्टाचार झाल्याने भरती रद्द करण्याच्या मागणीसाठी संघर्ष सुरू झाला होता़
अधिकाºयांवर कारवाई करा
मनपात अधिकाºयांकडून मनमानी कारभार सुरू आहे़ पाठपुरावा करून देखील कामे मार्गी लागत नाही़ आरोग्य विभागातील असल्याचा आरोप केला गेला आहे. यात पात्र उमेदवारांना हेतुपुरस्सर डावलले. दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर अंपळकर, महिला व बालकल्याण सभापती निशा पाटील, उपसभापती सुमन वाघ, नगरसेविका किरण कुलेवार, स्नेहल जाधव, विमल पाटील, सुनीता बडगुजर, भाजपा महिला आघाडीच्या रत्ना बडगुजर, सुलोचना चौधरी, कल्पना वाल्हे यांच्यासह इतर महिलांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त शांताराम गोसावी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली होती.
आरोग्य विभागातील रिक्त पदे
महापालिकेचे ९ अ‍ॅलोपॅथी व १ आयुर्वेदिक असे १० दवाखाने आहेत़ परंतु रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा पुरवितांना अडचणी निर्माण होत आहे़ १३ पदे मंजूर आहेत़ दहा वैद्यकीय अधिकाºयांवर महापालिकेचे दवाखाने व आरोग्य केंद्रांची जबाबदारी आहे़ त्यामुळे आस्थापना विभागाला रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र त्यामुळे सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
मनपाला : बदनाम करण्याचा प्रयत्न
भरती प्रक्रिया पारदर्शक आहे़ कोणतेही नियम डावलण्यात आलेले नाही़ प्रसिध्द करण्यात आलेली जाहीरात चुकल्याने नव्याने जाहिरात देण्यात आली होती़ योग्य व्यक्तीची निवडीनंतर भरती केली जाणार आहे़ काही कर्मचाºयांनी पदाधिकाºयांना हातीशी धरून आयुक्तांवर आरोप, तसेच महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहीती मनपा सुत्रांनी दिली़
पदाधिकाºया हाताशी धरून मनपात राजकारण केले जात आहे़ तब्बल १२ वर्षानंतर प्रदिर्घ अनुभवी डॉक्टर मिळाला आहे़ त्यामुळे अटी, पात्रता, निकषाचा आधारावर ही भरती प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे़
-सुधाकर देशमुख,
आयुकत,मनपा

Web Title: From the appointment of Health Officer Sundopusundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे