चिमुकल्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:53 PM2020-01-05T22:53:07+5:302020-01-05T22:53:57+5:30
विज्ञान प्रदर्शन : पाणी अडवा-पाणी जिरवा, प्लास्टिक बंदी आदीवर उपकरणे सादर
धुळे : शहरातील राजवाडे संशोधन मंडळासमोरील सेंट अॅन्थोनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे फादर विल्सन रॉड्रीक्स यांच्या संकल्पनेतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे़ यावेळी उपस्थितींना चिमुकल्यांना विविध उपक्रमांची माहिती दिली़
बालवयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच त्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळण्याच्या उद्देशाने सेंट अॅन्थोनी पूर्व प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जलसंधारण, पाणी अडवा-पाणी जिरवा, प्लास्टिक बंदी अशा विविध विषयावर प्रकल्प मांडले होते.
प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. चुडामण पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. उषा पाटील, प्राचार्य फादर विल्सन रॉड्रीक्स उपस्थित होते. बाल्यावस्थेत मुलांचा मेंंदूला चालना मिळाली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होण्यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम झाले पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांना विज्ञानाची माहिती देण्याची नितांत गरज आहे़ अशी मतडॉ़ पाटील यांनी व्यक्त केले़
यावेळी विद्यार्थ्याना पाणी अडवा-पाणी जिरवा, पाणी वाचवा, प्लास्टीक बंदी, पालेभाज्यांचे महत्त्व, वाहतूकीचे नियम, पर्यावरण, प्रदुषणांचे दुष्यपरिणाम, सेंद्रीय शेती, सिंगल युज प्लास्टिकमुळे होणार प्रदुषण ही उपकरणे मांडून त्याची माहिती देण्यात आली होती.