धुळे महापालिकेचे 241 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 04:22 PM2017-03-30T16:22:28+5:302017-03-30T16:22:28+5:30

महापालिकेचे 241 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आल़े

Approval of Dhule Municipal Corporation's budget of 241 crores | धुळे महापालिकेचे 241 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

धुळे महापालिकेचे 241 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Next

 धुळे, दि.30- महापालिकेचे 241 कोटींचे प्रशासकीय अंदाजपत्रक गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सादर करण्यात आल़े सभेत सदस्यांनी अंदाजपत्रकातील तरतुदींवर आक्षेपांचा ‘पाऊस’ पाडला़ अखेर स्थायी समितीने तब्बल 87 कोटींची वाढ सुचविली असली तरी प्रत्यक्षात 30 ते 35 कोटींची वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली़

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरूवारी सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ या सभेला आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त रविंद्र जाधव, प्ऱनगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होत़े सभेत सदस्यांनी अंदाजपत्रकात केलेल्या तरतुदींवर आक्षेप घेतला़ त्यात प्रामुख्याने नागरी सुविधांसाठी तरतुद नाही, शौचालयांसाठी अधिक तरतुद, नगररचना विभागाकडील विकास शुल्क, दंड, बिनशेती व अनुषंगिक बाबींचे उत्पन्न न दर्शविणे, रोजंदारी कर्मचा:यांचा प्रश्न, लेखा आक्षेपापोटी होत असलेली कर आकारणी यांसह विविध बाबींसाठी केलेल्या तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल़े सभेच्या अखेरीस आयुक्तांनी भुमिका मांडली़ त्यानंतर 241 कोटींच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीच्या सभेत मंजूरी देण्यात आली़ 
या तरतुदी सुचविल्या़़़
नागरी सुविधा-30 कोटी
नवीन गटारी व ड्रेनेज- 20 कोटी
अत्यावश्यक सुविधा- 1 कोटी
खेळाडूंना सानुग्रह अनुदान- 50 लाख
वृक्षलागवड- 10 कोटी
नवीन उद्यान- 1 कोटी 
जुनी देयके- 25 कोटी

Web Title: Approval of Dhule Municipal Corporation's budget of 241 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.