आकाशवाणी केंद्राच्या अधिकाºयाने मागितली महिला कर्मचाºयांची माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 06:07 PM2019-03-05T18:07:59+5:302019-03-05T19:16:21+5:30
महिला छेडखानीचा आरोप : ‘मनसे’चे आकाशवाणी केंद्रात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आकाशवाणी केंद्रातील कार्यक्रम अधिकाºयाकडून महिलांची छेडखानी होत असल्याची तक्रार येताच ‘मनसे’च्या पदाधिकाºयांनी त्यांच्या दालनात जावून चांगलाच जाब विचारला़ मंगळवारी दुपारी झालेल्या या प्रकारामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होते़
धुळे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी प्रदीप जारोंडे यांच्याकडून आकाशवाणी केंद्रातीलच काही महिलांची छेडखानी होत असल्याच्या तक्रारी होत्या़ यासंदर्भात देवपूर पोलीस ठाण्यात जावून पीडितांनी आपली कैफियत मांडली होती़ त्यामुळे जारोंडे यांना देवपूर पोलीस ठाण्यातील अधिकाºयांनी पोलीस ठाण्यात बोलावून कायदेशिर तंबी दिली होती़ या घटनेनंतर मनसेच्या पदाधिकारी प्राची कुलकर्णी यांच्याकडे देखील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या़ तक्रारी येताच प्राची कुलकर्णी यांच्यासह संजय सोनवणे, हर्षल परदेशी, प्रसाद देशमुख, शुभम माळी, तुषार मराठे आदी पदाधिकाºयांनी आकाशवाणी केंद्र गाठले़ प्रदीप जारोंडे यांना त्यांनी केलेल्या गैरकृत्याबाबत चांगलाच जाब विचारला़ एवढ्यावरच न थांबता त्यांनी आकाशवाणी केंद्राच्या बाहेर बोलावून पीडितांची माफी देखील मागायला भाग पाडले़ कान धरुन माफी मागितल्यानंतर पुन्हा असा प्रकार केल्यास तुमची खैर नाही, अशी देखील तंबी प्राची कुलकर्णीसह अन्य पदाधिकाºयांनी दिली़ यावेळी वातावरण अधिकच तणावपुर्ण झाले होते़ आकाशवाणीतील अशा कर्मचाºयाकडून महिलांचे शोषण होऊ नये, घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आकाशवाणी केंद्रातील महिला कर्मचाºयांना कायद्याचे संरक्षण मिळावे तसेच आकाशवाणी केंद्रातील महिलांना सुरक्षा समितीच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी विरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आकाशवाणी केंद्राला आदेश करावेत अशी मागणी मनसे पदाधिकाºयांनी यावेळी केली़
माझा कोणत्याही प्रकारचा दोष नाही़ कर्मचाºयांची ड्युटी लावण्याचे काम माझ्याकडे असते़ कोणाला जास्त तर कोणाला कमी ड्युटी लावली जात असल्याचा आरोप माझ्यावर नेहमी होत असतो़ त्यांच्या आपापसातील अंतर्गत वादाचा मी बळी ठरलो़
- प्रदीप जारोंडे
कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी, धुळे